Fire NOC | PMC Pune | फायर एनओसी बाबतच्या तक्रारी टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!
Fire NOC | PMC Pune | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) क्षेत्रांत येणाऱ्या विविध प्रकारच्या व सर्व उंच इमारतींचे बांधकाम नकाशे मंजूर करण्यापूर्वी प्राथमिक अग्निशमन दाखला देण्यात येतो. तसेच भोगवटा पत्र देणेपूर्वी पुणे महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत (PMC Fire Brigade Department) अग्निशमन सेवा शुल्क आकारून अंतिम अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र अंतिम दाखला देताना हेरफार केल्याची उदाहरणे निदर्शनास आली आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे टाळण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी नवीन नियमावली जारी केली आहे. (Pune Municipal Corporation News)
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियम २००६ कलम ३ (२) व ४ (१) तसेच एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावली २०२० नुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रांत येणाऱ्या विविध प्रकारच्या व सर्व उंच इमारतींचे बांधकाम नकाशे मंजूर करण्यापूर्वी प्राथमिक अग्निशमन दाखला देण्यात येतो. तसेच भोगवटा पत्र देणेपूर्वी पुणे महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत अग्निशमन सेवा शुल्क आकारून अंतिम अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. प्राथमिक अग्निशमन ना हरकत दाखल्यामध्ये नमुद केलेल्या अग्निशमन यंत्रणेचे काम संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, मुंबई यांनी परवाना दिलेल्या फायर लायसन्स एजन्सी यांच्या कडून केले जाते. तथापी, फायर लायसन्स एजन्सी अग्निशमन यंत्रणेचे काम करतांना मंजुर बांधकाम नकाशानुसार जागेवर बांधकाम नसतांना देखील अग्निशमन यंत्रणेचे काम करणे, अग्निशमन यंत्रणेचे चुकीच्या पध्दतीने काम करणे, भारतीय मानांकनाचे (ISI Mark) अनुपालन न
करता अग्निशमन यंत्रणेचे काम करणे, फायर लायसन्स एजन्सी स्वतः अग्निशमन यंत्रणेचे काम न करता “फॉर्म-अ/ फॉर्म-ब” अदा करणे व दोन फायर लायसन्स एजन्सींनी काम केल्यामुळे संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे अडचणीचे होणे अशा बाबी घडल्याचे निदर्शनास आले आहे. यातून तक्रारीचे प्रसंग उद्भवले आहेत. या बाबी टाळण्यासाठी कार्यपद्धतीत सुसूत्रता आणली आहे. (PMC Pune News)

अग्निशमन यंत्रणेचे काम करण्यापूर्वीची कार्यपध्दती (प्राथमिक अग्निशमन दाखल्यासाठी)
१) बांधकाम नकाशे मंजुरी असल्याची तसेच जागेवरील बांधकाम मंजुर बांधकाम नकाशानुसार झाले आहे किंवा नाही (जसे साईड मार्जीन, जीन्याची रुंदी, पॅसेज वॉटर टँक इत्यादी) याची खात्री करुनन फायर लायसन्स एजन्सी यांनी अग्निशमन यंत्रणा उभारणीचे प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी.
२) प्राथमिक अग्निशमन ना-हरकत दाखल्यात नमुद केल्याप्रमाणे अग्निशमन यंत्रणेचे काम जागेवर सुरु करण्यापूर्वी अग्निशमन यंत्रणेच्या कामाचा नकाशे तयार करुन ते अग्निशमन विभागा कडून मंजुर करुनच लायसन्स एजंसी णे तयार केलेले अग्निशमन यंत्रणेचे काम प्रत्यक्ष जागेवर सुरु करण्यात यावेत.
३) नियमितीकरण बांधकामाच्या अग्निशमन यंत्रणेचे काम सुरु करण्यापूर्वीदेखील अग्निशमन यंत्रणेच्या कामाचे नकाशे तयार करुन ते अग्निशमन विभागाकडून मंजुर करुनच अग्निशमन यंत्रणेचे काम जागेवर सुरु करण्यात यावेत.
४) अग्निशमन यंत्रणेचे काम करतांना आवश्यक त्या सर्व ठिकाणी / वापरण्यात येणाऱ्या उपकरणांसाठी भारतीय मानंकनाचे (ISI Mark) अनुपालन करावे. तसेच या यंत्रणेचे काम करताना वापरण्यात येणारे साहित्याचा मेक व तांत्रिक माहिती स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक राहील.

अग्निशमन यंत्रणेचे काम केल्यानंतर करावयाची कार्यपध्दती (अंतिम अग्निशमन ना- हरकत दाखल्यासाठी)
१) अग्निशमन यंत्रणेचे काम जागेवर पूर्ण झाल्यानंतर फायर लायसन्स एजन्सी यांनी प्रथम अग्निशमन यंत्रणेची चाचणी घेऊन चाचणी यशस्वीरित्या पार पडल्यावर सदर चाचणीस समधानकारक असल्यास त्याबातचे विकासकाचे प्रमाणपत्र घेऊन फायर लायसन्स एजन्सी यांनी विकासक यांना फॉर्म अ अदा करावा.
२) अंतिम अग्निशमन ना हरकत प्रस्तावासाठी प्रस्ताव दाखल करतांना जागेवर काम करण्यात आल्याप्रमाणे अग्निशमन यंत्रणेच्या कामाचे नकाशे (Fire System Layout) व Hydraulic Calculation सादर करणे आवश्यक राहिल.
३) अग्निशमन विभागाने दिलेली चेक लिस्ट नुसार अंतिम अग्निशमन ना-हरकत प्रस्ताव सादर करावा.
४) अग्निशमन यंत्रणेचे काम एकापेक्षा अधिक फायर लायसन्स एजन्सी यांनी केले असल्यास कोणत्या एजन्सी यांनी कोणते काम केले आहे याबाबत मेक व तांत्रिक माहितीसह स्पष्ट उल्लेख असावा. अशा एजंसीची नावे अंतिम ना-हरकत दाखल्यात दाखल करण्यात येतील
५) अपूर्ण अग्निशमन यंत्रणेचे काम करतांना पूर्वीच्या फायर लायसन्स एजन्सी यांनी केलेल्या कामाबातचा तपशिल व अग्निशमन कायद्याप्रमाणे आवश्यक Form-A विकासकामार्फत सादर करणे आवश्यक आहे.
६) अग्निशमन यंत्रणेचे काम करतांना वापरण्यात आलेल्या अग्निशमन पंपाची क्षमता, पंपाचा सिरियल नंबर, पॅनल डिटेल्स याचा समावेश असणे अत्यावश्यक राहील तसेच फायर हायड्रन्ट, डिटेक्शन स्पिन्कलर्स, पाईप्स, फायर डोअर ( Fire Door) यांचे मेक, क्षमता व संख्या तसेच आवश्यकतेनुसार सिरियल नंबर उपलब्धे नुसार “FORM-A” मध्ये नमुद करणे आवश्यक राहील.