Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात तीन नवीन अभ्यासक्रम

HomeपुणेBreaking News

Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात तीन नवीन अभ्यासक्रम

गणेश मुळे Jul 17, 2024 3:31 PM

Veer Savarkar Jayanti | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती | फर्ग्युसन मधील खोली आज राहणार दर्शनासाठी खुली
Pune Hindi News | Savarkar Jayanti | पुणे के फर्ग्यूसन कॉलेज में स्वातंत्र्यवीर सावरकर का कमरा कैसा है?  जान लो 
Swatantra Veer Savarkar | Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन

Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात तीन नवीन अभ्यासक्रम

Fergussion College Pune – (The Karbhari News Service) – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Deccan Education Society) फर्ग्युसन (स्वायत्त) महाविद्यालयात (Fergusson College) बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर), औद्योगिक जैव संगणकीत मूलभूत कोर्स (इंडस्ट्रियल बायो इन्फॉर्मेटिक्स) आणि जिओ इकॉनॉमिक्स हे तीन नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करीत असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

‘बौद्धिक संपदा अधिकार’ या अभ्यासक्रमात पेटंट कायदा, ट्रेडमार्क कायदा, नोंदणी प्रक्रिया, औद्योगिक डिझाईन नोंदणी, कॉपीराईट या विषयांचा समावेश असेल. पदवी घेणारे विद्यार्थी किंवा या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल.

‘औद्योगिक जैव संगणकीत मूलभूत कोर्स’मध्ये नवीनतम जैवसंगणकीत साधने आणि तंत्रांचा वापर करून व्यावहारिक अनुभव मिळेल. ज्यामुळे जैविक डेटाचे प्रभावी विश्लेषण आणि अर्थ लावणे सोपे जाईल. विज्ञान शाखेतील पदवीधर, फार्मसी, एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, संगणक विज्ञान या क्षेत्रांतील विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.

‘जिओ इकॉनॉमिक्स’ या अभ्यासक्रमात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय भूराजकीय परिस्थिती, परराष्ट्र धोरण व अर्थनीती, दहशतवाद व राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण व विकासात्मक प्रश्न या विषयांचा समावेश असेल. पदवी किंवा त्यापुढील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.

तीनही अभ्यासक्रमांच्या अधिक माहितीसाठी www.fergusson.edu या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.