कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता यांची अखेर कोविड कामातून सुटका
: मूळ खात्यात काम करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
पुणे : शहरात कोरोनाचा प्रसार(Spread of Corona) थांबवण्यासाठी महापालिकेकडून (Pune municipal Corporation) वेगेवगेळ्या उपाययोजना करण्यात येत होत्या. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेकडून जम्बो हॉस्पिटल, बाणेर कोविड हॉस्पिटल, अशा मोठ्या कोविड सेंटर (Covid care Center) ची निर्मिती केली होती. त्यासाठी अभियांत्रिकी संवर्गातील (Engineering staff) कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, उप अभियंता यांची नेमणूक केली होती. मात्र आता कोविड चा जोर कमी झाल्याने या कर्मचाऱ्यांची या कामातून सुटका करण्यात आली आहे. त्यांना मूळ खात्यात काम करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी दिले आहेत.
: काय आहेत आदेश
पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड केअर सेंटर (CCC), कोविड केअर हॉस्पिटल (DCH बाणेर), अभियांत्रिकी महाविद्यालय मैदान (कोविड जंबो हॉस्पिटल) व इतर ठिकाणी अभियांत्रिकी संवर्गातील कार्यकारी अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)/ उप अभियंता (स्थापत्य/विद्युत यांत्रिकी) / शाखा अभियंता (स्थापत्य/विद्युत) / कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) या पदावरील अधिकारी /कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेच्या कामकाजास असलेले अधिकारी/कर्मचारी यांना या आदेशान्वये कार्यमुक्त करण्यात येत आहे. सदर कर्मचाऱ्यास स्वतंत्र कार्यमुक्तीची आवश्यकता नाही. त्यानुसार सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी आपल्या मूळ खात्यात रुजू व्हावयाचे आहे. सदर अधिकारी /कर्मचारी मूळ खात्यात हजर झाले नंतरच त्यांचे महिनेमहाचे वेतन संबधित खातेप्रमुख यांनी आदा करावे. अधिकारी/कर्मचारी यांना कार्यमुक्त केल्यानंतर भविष्यात सदर सेवकांची आवश्यकता भासल्यास सदर सेवकांना उपलब्ध करून देण्यात येईल. तरी संबंधीत खातेप्रमुख यांनी पुढील योग्यती तजवीज करावी.
COMMENTS