Environment Law | Shivsena UBT | पर्यावरण हिताचा कायदा पुन्हा लागू करण्यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

HomeपुणेBreaking News

Environment Law | Shivsena UBT | पर्यावरण हिताचा कायदा पुन्हा लागू करण्यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Ganesh Kumar Mule Aug 10, 2023 3:34 PM

Pune Municipal Corporation issues WhatsApp number for complaints of abandoned vehicles
Sunil Shinde | माथाडी कायदा बदलायला निघालेल्या महायुतीला धडा शिकवा : कामगार नेते सुनील शिंदे
Fursungi TP Scheme | फुरसुंगी टीपी स्किम प्रारूप आराखड्यावर 191 हरकती

Environment Law | Shivsena UBT | पर्यावरण हिताचा कायदा पुन्हा लागू करण्यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Environment Law | Shivsena UBT |  महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पर्यावरणाच्या हिताचा हेरिटेज ट्री आणि २०० हून अधिक वृक्षतोडीवर नियंत्रणासाठी कायदा अमलात आणला होता . महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरण स्थापन करुन अवैद्य वृक्षतोडीवर आळा बसविणारा हा कायदा लोकप्रिय झाला होता . आत्ताच्या त्रिकुट सरकारने विकासला विरोध म्हणून हा कायदा रद्द करुन वृक्ष तोडीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थानाच दिले आहे यामुळे असंख्य वृक्षतोड होणार असून या विरोधात शिवसेना ( उद्भव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena UBT) पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी पुणे कार्यालयावर आंदोलन करण्यात आले तसेच निवेदन ही देण्यात आले. (Environment Law | Shivsena UBT)
शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले महाराष्ट्रातील वृक्षांच संवर्धन व्हावं आणि या महाराष्ट्र सुजलाम रहावा. हिरवाई अशीच कायम टिकून रहावी, म्हणून नवीन कायदा अमलात आणला होता. आणि त्याद्वारे  महाराष्ट्रातील झाडांची कत्तल थांबणार होती. सर्व थरातून या नवीन कायद्याच कौतुक झालं होत. आदित्य ठाकरेंच झालेल कौतुक या आताच्या चालू त्रि कुटील सरकारला बघवल गेल नाही म्हणून अधिवेशनामध्ये या सरकारने नवीन विधेयक आणून मविआने केलेला कायदा रद्दबादल ठरवण्यात आला. त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून केलेला कायदा जर अमलात आला असता आणि टिकला असता तर या महाराष्ट्रातील संपूर्ण झाडे सांभाळली गेली असती, पुण्यातील वेताळ टेकडीवरील झाडे असतील, नदी सुधार प्रकल्पातील जी साडेसात हजार झाडांची कत्तल होणार आहे ती थांबण्यासाठी मदत झाली असती. पर्यावरणाचा होणारा र्हास थांबण्यास मदत झाली असती.
थरकुडे म्हणाले पुण्यातल पर्यावरण म्हणून आदित्य ठाक,ए आग्रही होते. त्यांनी पुण्यात अनेक संस्थासोबत, अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्या होत्या. पुण्याचीच हरितकरण व्हावे म्हणून ते आग्रही होते.
याप्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला शहरसंघटिका संगिता ठोसर, पल्लवी जावळे, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, भरत कुंभारकर, तानाजी लोणकर, अनंत घरत, उमेश गालिंदे, उमेश वाघ, विश्वास चव्हाण, रविंद्र मुजुमले, विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, राजेंद्र बाबर, नितीन शिंदे, रामदास गायकवाड, विभाग प्रमुख राजेश मोरे, संतोष सोनवणे, अतुल गोंदकर, भगवान वायाळ, चंदन साळुंके, मुकुंद चव्हाण, बाळा अल्हाट, युवासेनेचे सनी गवते, परेश खांडके, निकिता मारटकर, गायत्री गरूड, आदर्श नानावरे, नागेश खडके, संतोष शेलार , संतोष गोपाळ, प्रविण डोंगरे, नंदू घाटे, अजय परदेशी, विकी धोत्रे, संजय वाल्हेकर, बाळासाहेब मोडक, देवेंद्र शेळके, संदिप नवले, मारूती ननावरे, रमेश सोनवणे,विजय परदेशी, दत्ता घुले, शरद गुप्ते, नरेंद्र दरवडे, परवेश राव, विलास कथलकर, ज्ञानेश्वर पोळ, काका कुलकर्णी , शाहेबाज पंजाबी, सागर मोकर, संदीप सोनार, राहुल शेडगे, प्रविण रणदिवे , हर्षद ठाकर, राहुल बोडके , विशाल डोंगरे, नितीन थोपटे, नितीन रावळेकर, दिलीप महादे, नंदू जांभळे , इतर शिवसैनिक उपस्थित होते ..