PMC Employees Union | ब्रोकर नेमण्याची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यासाठी प्रयत्न व्हावेत | पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची पुणे मनपा कामगार युनियन (मान्यताप्राप्त) संघटनेकडे मागणी 

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees Union | ब्रोकर नेमण्याची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यासाठी प्रयत्न व्हावेत | पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची पुणे मनपा कामगार युनियन (मान्यताप्राप्त) संघटनेकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Jun 30, 2022 2:20 AM

Insurance Broker | CHS | ईन्शुरंस ब्रोकर नेमणुकीची निविदा प्रक्रिया रद्द करा | कर्मचारी संघटनांची महापालिका आयुक्ताकडे मागणी 
PMC pune| CHS | अंशदायी वैद्यकीय योजने वरून कर्मचारी संघटना आक्रमक |  पालकमंत्र्यांची घेतली भेट  | पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रशासना सोबत करणार चर्चा 
CHS Portal | PMC Health Service | CHS पोर्टल वर माहिती नाही भरली कर्मचाऱ्यांना पत्र दिले जाणार नाही | अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचा कर्मचाऱ्यांना इशारा

ब्रोकर नेमण्याची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यासाठी प्रयत्न व्हावेत

| पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची पुणे मनपा कामगार युनियन (मान्यताप्राप्त) संघटनेकडे मागणी

पुणे | अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना बंद करून खाजगी विमा कंपनीस वैद्यकीय योजना चालविणेस देणेबाबत आरोग्य विभागाकडून  टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या माध्यमातून ब्रोकर नेमण्यात येणार आहे. मात्र यात महापालिका कर्मचाऱ्यांचे नुकसान आहे. त्यामुळे कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान पीएमसी एम्प्लॉईज युनियन ने पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) या संघटनेकडे ब्रोकर नेमण्याची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष प्रदीप महाडिक आणि सरचिटणीस आशिष चव्हाण यांनी कामगार युनियन च्या सरचिटणिसांना पत्र देखील दिले आहे.

| पीएमसी एम्प्लॉईज युनियन ने काय म्हटले आहे?

पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना सन १९६७ पासून अविरतपणे आजतागायत सुरु आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती गठीत असून या समितीमध्ये आपण सदस्य म्हणून कार्यरत आहात. ०१ जून २०२२ रोजी  वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन पुणे मनपा प्रशासनाने अंशदायी वैद्यकीय सहाय्य

योजना बंद करून खाजगी विमा कंपनीस वैद्यकीय योजना चालविणेस देणेबाबत प्रक्रिया सुरू केलेली आहे. याबाबत पुणे महानगरपालिका कामगार युनियन(मान्यताप्राप्त) व सहयोगी संघटनांना मनपा प्रशासनाने कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही. सदर योजना खाजगी विमा
कंपनीमार्फत चालविण्यास देणेबाबत महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा प्रखर विरोध असून या बाबत युनियनने तातडीने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
तरी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना कायमस्वरूपी बंद होऊन विमा कंपनीमार्फत नवीन वैद्यकीय योजना राबविल्यास सर्वच कर्मचाऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून, सन १९६७ पासून सुरू असलेली कामगारांचे आरोग्याशी निगडीत अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना अशीच यापुढे देखील चालू राहावी यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून सदर टेंडर प्रक्रिया रद्द करणेसाठी संघटनेमार्फत प्रयत्न व्हावेत अशा भावना सर्व कामगार बंधू व भगिनी व्यक्त करीत आहेत.
दम्यान पुणे महानगरपालिका कामगार युनियन देखील याबाबत आक्रमक आहे. संघटनेच्या अध्यक्षांनी सर्व कामगारांना आवाहन केले आहे कि कुठल्याही परिस्थितीत आपली योजना बंद होणार नाही. याबाबत कायदेशीर लढाई लढली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यानी काळजी करू नये.