मैलापाणी शुद्धीकरण केंद्रावरील कंत्राटी कामगारांना ई-पेहचान पत्राचे वितरण
| कामगार विभागाच्या आदेशानुसार विद्युत विभागाकडून अमल
पुणे | पुणे महानगरपालिके (PMC Pune) अंतर्गत ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना (contract employees) राज्य कामगार विमा योजनचे ई-पेहचान पत्र (E-identity card) वितरीत करणे बंधनकारक आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांना हे पत्र मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार मुख्य कामगार अधिकाऱ्यांनी याबाबत कडक धोरण अवलंबले असून कंत्राटी कामगारांना ई पेहचान पत्र दिल्याशिवाय ठेकेदारांना बिल देऊ नये, असे आदेश मुख्य कामगार अधिकाऱ्यांनी (Chief Labour Officer) सर्व खात्यांना दिले होते. त्यानुसार विद्युत विभागाने (Electricity Department) यावर अमल करणे सुरु केले आहे. मैलापाणी शुद्धीकरण केंद्रावरील (STP) कंत्राटी कामगारांना विद्युत विभागाकडून ई-पेहचान पत्र वितरित करण्यात आले. अशी माहिती विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल (Chief Engineer Shriniwas Kandul) यांनी दिली.
पुणे महानगरपालिकेतर्फे विविध विकास प्रकल्प व देखभाल दुरुस्तीची कामे निविदेव्दारे कंत्राटी कामगारांमार्फत करण्यात येत आहेत. राज्य कामगार विमा अधिनियम १९४८ मधील तरतुदीनुसार कंत्राटी कामगारांना त्यांचा विमा क्रमांक अवगत होणे, आधारकार्ड लिंक करणे, वैद्यकीय सुविधा मिळणेसाठी ई-पेहचान पत्र कंत्राटी कामगारांकडे असणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेतील ठेकेदारामार्फत सेवा घेण्यात येणाऱ्या कंत्राटी कामगारांना ईएसआय रकमेचा भरणा करूनही ई-पेहचान पत्र मिळत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. याअनुषंगाने कार्यवाही करणेबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) यांनी निर्देश दिले होते. (PMC Pune contract employees)