Dy MOH Promotion | उप आरोग्य अधिकारी पदाच्या पदोन्नतीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात | सरकार कडून मागवला अभिप्राय 

Homeadministrative

Dy MOH Promotion | उप आरोग्य अधिकारी पदाच्या पदोन्नतीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात | सरकार कडून मागवला अभिप्राय 

Ganesh Kumar Mule Feb 04, 2026 6:49 PM

Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती
Retired PMC employees | दोन वर्षांपासून सांगताहेत दोन दिवसांत प्रकरण मार्गी लागेल म्हणून!  | महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची व्यथा 
Social Security | Ganesh Mandal pune| सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन

Dy MOH Promotion | उप आरोग्य अधिकारी पदाच्या पदोन्नतीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात | सरकार कडून मागवला अभिप्राय

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील आरोग्य विभागाच्या  उप आरोग्य अधिकारी पदाच्या पदोन्नती वरून वाद सुरु आहे. सद्यास्थितीत पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्या कडील  CPS DPH पदविका ग्राह्य धरावी का नाही, याबाबत आता महापालिका आयुक्त यांनी राज्य सरकार कडून मार्गदर्शन मागवले आहे. याबाबत महापालिका आयुक्त यांनी प्रधान सचिव यांना पत्रव्यवहार केला आहे. सरकारचा अभिप्राय काय येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (PMC Officers Promotion)

आरोग्य विभागातील उप आरोग्य अधिकारी पदासाठी पदोन्नती देण्यात येणार आहे. महापालिका नियमावली आणि सेवाज्येष्ठते नुसार यासाठी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक आणि डॉ वैशाली जाधव पात्र होत आहेत. त्यानुसार बढती समितीत निवड यादी बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. आरोग्य विभागांतील उप आरोग्य अधिकारी आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदाच्या पदोन्नती प्रक्रियेत “College of Physicians and Surgeons (CPS), मुंबई येथून प्राप्त झालेली Diploma in Public Health (DPH) ही पदविका ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी तक्रार आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन आणि आयुक्त यांच्याकडे केली आहे. दरम्यान या अधिकाऱ्यांकडे हीच पदविका आहे. मात्र हा आक्षेप चुकीचा असल्याचा दावा सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.

उप आरोग्य अधिकारी पदासाठी नेमणुकीची अर्हता आणि पद्धत काय आहे?

महापालिका सेवा नियमावली नुसार महापालिका उप आरोग्य अधिकारी पद हे नामनिर्देशन आणि १००% पदोन्नती ने भरले जाते. त्यासाठीची शैक्षणिक अर्हता आणि पद्धत ही अशी आहे

उप आरोग्य अधिकारी तथा उप आरोग्य प्रमुख उप आरोग्य प्रमुख (कुटुंब कल्याण)

नामनिर्देशन – अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय शास्त्रातील सार्वजनिक प्रतिबंधात्मक व सामाजिक आरोग्य शास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी (M.D.(P.S.M.)] परीक्षा उत्तीर्ण.
ब) राज्य शासन / केंद्रशासन / स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील सहाय्यक आरोग्य अधिकारी / प्रभाग वैद्यकीय अधिकारी वा तत्सम पदावरील किमान ७  वर्षांचा पर्यवेक्षीय व कार्यकारी पदाचा अनुभव आवश्यक.
क) रुग्णालयातील प्रशासन, सार्वजनिक आरोग्य व प्रतिबंधात्मक उपचारात्मक बाबी समर्थपणे हाताळण्याचा व विशेषतः स्वच्छता पर्यवेक्षण, साथ आजार निर्मुलन कार्यक्रम, हिवताप नियंत्रण आदी बाबींच्या कार्याचा किमान ०५ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य.

पदोन्नती – १००% नामनिर्देशनासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत सहाय्यक आरोग्य अधिकारी या संवर्गातील किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

| CPS DPH पदविका वैध असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा

CPS पदविका असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना या आधी पदोन्नती देण्यात आलेली आहे आणि पदावर कार्यरत आहेत. त्याच प्रमाणपत्रावर आज आक्षेप घेणे म्हणजे विषम वागणूक आणि न्याय्य अपेक्षेचा भंग आहे. यामुळे प्रशासकीय व्यवस्थेत असमाधान आणि मानसिक तणाव निर्माण होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या विधी विभागाने CPS पदविकांची वैधता मान्य केली आहे. या अनुषंगाने CPS DPH धारक अधिकाऱ्यांना पदोन्नतीस पात्र सल्ला विधी विभागाने दिला आहे. तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने देखील सामान्य प्रशासन विभागस CPS DPH पदविका वैध असल्याचे कळविले आहे.  अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे कार्यरत असून, सार्वजनिक आरोग्य विषयक योजना, साथ रोग नियंत्रण, आरोग्य मोहिमा इ. मध्ये आमचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. अशा अनुभवी अधिकाऱ्यांना केवळ पदविकेवर आक्षेप घेऊन रोखणे अन्यायकारक ठरेल. ३४ नवीन गावांचा समावेश झाल्याने लोकसंख्या वाढ झालेली आहे, त्यामुळे आरोग्य विषयक कामकाजाची व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा विस्तार होणे अत्यंत गरजेचे आहे. असा दावा सहायक आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र हा वाद थांबला नाही, म्हणून प्रशासनाने अखेर यावर राज्य सरकार कडून मार्गदर्शन मागवले आहे.

| काय मागवला आहे अभिप्राय

प्रशासानाकडील उप आरोग्य अधिकारी पदावर पदोन्नती देताना त्यांची कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स मुंबई यांची D.P.H. पदविका ग्राह्य धरून पदोन्नती प्रक्रियेमध्ये करता येईल किंवा कसे? यावर महापालिका प्रशासनाने अभिप्राय मागवला आहे.

त्यात म्हटले आहे कि,
१) २६/०७/२०२४ रोजी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘Public Notice’ मधील नमूद बाब विचारात घेता, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, मुंबई यांचेकडील १७/१०/२०२५ चे पत्रानुसार कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स, मुंबई यांचेकडून D.P.H. पदविका अभ्यासक्रम चालविण्यास बंद करण्यापूर्वी ज्यांनी सदर महाविद्यालयाकडून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, त्याच्या पदविका नियुक्ती व पदोन्नतीसाठी ग्राह्य धरता येतील का?

२) त्यानुसार पुणे महानगरपालिकेतील “उप आरोग्य अधिकारी” पदाच्या पदोन्नतीसाठी २६/०७/२०२४ रोजीची सार्वजनिक नोटीस जाहीर होण्यापूर्वी कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स, मुंबई यांचेकडून धारण केलेली D. P. H. पदविका ग्राह्य धरून अशा अधिकाऱ्यांचा पदोन्नतीच्या प्रक्रियेमध्ये विचार करता येईल का?

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: