Dr Siddharth Dhende | इफ्तार पार्टीतून सामाजिक एकोप्‍याचा संदेश  |  प्रभाग क्रमांक दोन मध्ये आयोजन ; माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

HomeBreaking Newsपुणे

Dr Siddharth Dhende | इफ्तार पार्टीतून सामाजिक एकोप्‍याचा संदेश |  प्रभाग क्रमांक दोन मध्ये आयोजन ; माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

गणेश मुळे Apr 07, 2024 2:39 PM

Buddha Purnima | शिक्षण आणि नैतिकतेचा वापर समाजासाठी हवा : कुलसचिव डॉ. विजय खरे | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार
Vijaystambh | विजयस्तंभ शौर्यदिन नियोजन व समन्वयासाठी सरपंच व समिती सदस्यांची संयुक्त बैठक
Power Cut In Pune News | महावितरण अधिकाऱ्यांनो कारभार सुधारा अन्यथा नागरिकांसह भव्य मोर्चा काढू

Dr Siddharth Dhende | इफ्तार पार्टीतून सामाजिक एकोप्‍याचा संदेश

|  प्रभाग क्रमांक दोन मध्ये आयोजन ; माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

 

Dr Siddharth Dhende – (The Karbhari News Service) – मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त पुणे महापालिकेच्‍या प्रभाग क्रमांक दोन मध्ये रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली. सामाजिक एकोपा व सलोखा जपण्यासाठी दरवर्षी माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांच्‍या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित केला जता आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्याच्‍या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असल्‍याचे प्रतिपादन माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांनी या वेळी केले.

प्रभाग दोन मधील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधील यश फाऊंडेशन, नटराज गंगावणे समाज विकास भवन येथे या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या वेळी आरपीआयच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष ऍड. आयुब शेख, माजी नगरसेविका फरजाना शेख, आरपीआयचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, माजी नगरसेवक अशोक कांबळे, भाजपचे सुरेंद्र पठारे, प्रवक्ता मंगेश गोळे ,नामदेव घाडगे, काँग्रेसचे शिवाजी ठोंबरे, डॅनियल मगर, महेश वाघ, हिंदू संस्‍कृती मंचचे अध्यक्ष दिलीप म्हस्के, प्रेरणा ज्‍येष्ठ नागरिक संघाचे नामदेवराव वेताळ आदीसह हिंदु, मुस्लिम, बौद्ध, इसाई यांच्‍यासह विविध जाती-धर्मातील समाजबांधव उपस्थित होते. या वेळी शिरखुर्मा व सुका मेवाचे वाटप करण्यात आले.

पुणे महापालिकेच्‍या प्रभाग क्रमांक दोन मध्ये सामाजिक एक्‍याची परंपरा जपली जात आहे. गेल्‍या १७ वर्षांपासून रमजान ईद निमित्‍त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात सर्व जाती-धर्माचे नागरिक सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांच्‍या पुढाकाराने शिरखुर्मा आणि सुका मेवाचे वाटप करण्यात येते. यंदाच्‍या वर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. या वर्षी एकूण २७० कुटुंबाला सुका मेवाचे वाटप करण्यात आले आहे.
——-

सर्व जाती-धर्मातील लोकांमध्ये भाईचारा कायम टिकावा, यासाठी आम्‍ही सुरूवातीपासून उपक्रम घेत आहोत. संविधानाने ज्‍या मानवी मुल्‍यांची रुजवणूक केली आहे. त्‍याच्‍या अंमलबजावणीचा प्रयत्‍न प्रभाग दोन मधील सर्वच नागरिकांकडून केला जात आहे. सर्वधर्म समभाव ही भावना प्रभाग क्रमांक दोन मध्ये जपली जात असल्‍याचे दिसते.

डाॅ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.