Dr Ramesh Shelar PMC | डॉ रमेश शेलार यांचा पीएचडी केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सन्मान! | कार्यकारी पद देण्याची मागणी

Homeadministrative

Dr Ramesh Shelar PMC | डॉ रमेश शेलार यांचा पीएचडी केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सन्मान! | कार्यकारी पद देण्याची मागणी

Ganesh Kumar Mule Sep 24, 2024 10:49 AM

Dr Ramesh Shelar PMC | मुख्य अभियंता (विद्युत) पद भरताना अनियमितता झाली असल्याचा डॉ रमेश शेलार यांचा आरोप | आस्थापना विभागाची चौकशी करण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी
Dr Ramesh Shelar | डॉ रमेश शेलार यांची महापालिका सामान्य प्रशासन विभागाची विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार!
Dr Ramesh Shelar PMC | डॉ रमेश शेलार यांना राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन केले जाणार सन्मानित!

Dr Ramesh Shelar PMC | डॉ रमेश शेलार यांचा पीएचडी केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सन्मान! | कार्यकारी पद देण्याची मागणी

 

Dr Ramesh Shelar PMC- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्य घनकचरा विभागात (PMC Solid Waste Management Department) पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) पदावर काम करणारे अधिकारी डॉ रमेश शेलार (Ramesh Shelar) यांना पीएचडी केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे. MIT विद्यापीठाच्या आवारात हा कार्यक्रम काल (सोमवारी) संपन्न झाला. यावेळी पीएचडी प्रबंधाबाबत राज्यपाल यांनी डॉ शेलार यांच्याकडे विचारपूस केली. (Pune Municipal Corporation-PMC)

डॉ शेलार यांना एमआयटी विद्यापीठाने (MIT University) पीएचडी (Ph.D.) प्रदान केली आहे.
त्यांना एम.आय.टी. आर्ट, डिझाईन, टेक्नोलॉजी युनिवर्सिटी पुणे यांचे कडून त्यांनी सादर केलेले प्रबंध “THE STUDY OF TRANSFORMATION OF SOLID WASTE TO REVENUE WITH REFERENCE TO MUNICIPAL CORPORATIONS IN WESTERN REGION OF MAHARASHTRA” यांस 4 एप्रिल रोजी पि.एच.डी. प्रदान करण्यात आली आहे.

दरम्यान MIT विद्यापीठाचा काल दीक्षांत समारंभ होता. यात पीएचडी धारकांना गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात डॉ शेलार यांचा देखील सन्मान केला गेला आहे. महापालिकेच्या काही मोजक्याच अधिकाऱ्यांपैकी पीएचडी आणि गोल्ड मेडल मिळवणारे म्हणून डॉ शेलार यांना मान मिळाला आहे.

दरम्यान शेलार यांना आता पीएचडी मिळाली आहे. शिवाय राज्यपालांनी सन्मान केला आहे. त्यांचा महापालिकेतील कामाचा अनुभव देखील दांडगा आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा पालिकेच्या कामासाठी उपयोग करून घेतला जाणार का? त्यांना कार्यकारी पद दिले जाणार का किंवा त्यांना त्यांच्या मूळ पदावर पाठवले जाणार का? अशी मागणी या निमित्ताने जोर धरू लागली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0