Dr Ramesh Shelar | डॉ रमेश शेलार यांची महापालिका सामान्य प्रशासन विभागाची विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार!

HomeBreaking Newsपुणे

Dr Ramesh Shelar | डॉ रमेश शेलार यांची महापालिका सामान्य प्रशासन विभागाची विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार!

गणेश मुळे Jul 09, 2024 12:54 PM

PMC Transfer | महापालिकेच्या बदली प्रक्रियेत सरकारने हस्तक्षेप करावा | पुणे काँग्रेस ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
G 20 summit in pune | Sinhagad Fort | G 20 परिषदेतील परदेशी पाहुणे करणार सिंहगडाची सफर!
PMC Pune new Villages | समाविष्ट 34 गावांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारचे आदेश 

Dr Ramesh Shelar | डॉ रमेश शेलार यांची महापालिका सामान्य प्रशासन विभागाची विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार!

PMC General Administration Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत घनकचरा विभागातील  प्रभारी पर्यावरण व्यवस्थापक डॉ रमेश शेलार (Dr Ramesh Shelar PMC) यांनी पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाची विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) यांच्याकडे तक्रार केली आहे. विभागाची योग्य ती चौकशी करून आपल्याला योग्य तो न्याय द्यावा. अशी मागणी डॉ शेलार यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

डॉ.रमेश शेलार यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार मी पुणे महानगरपालिकेत १६ सप्टेंबर १९९५ मध्ये कनिष्ठ अभियंता (वर्ग -३) म्हणून रुजु झालेलो आहे. ०२/०३/२००९ पासून मुख्य सुरक्षा अधिकारी (वर्ग-१) या पदावरती खाते अधिकारी म्हणून सरळ सेवेने महानगरपालिकेत नियुक्त झालेलो आहे.
१६/०९/१९९५ ते ०१/०३/२००९ या काळामध्ये कनिष्ठ अभियंता, प्र. सहाय्यक आयुक्त ( क्षेत्रिय अतिक्रमण कार्यालय), विशेष कार्याधिकारी (आकाश चिन्ह परवाना) इत्यादी विभागामध्ये कामकाज पहिले आहे.  ०२/०३/२००९ पासून मुख्य सुरक्षा अधिकारी (वर्ग- १) या पदाबरोबर विशेष कार्यअधिकारी (आकाश चिन्ह परवाना), उप आयुक्त (बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन), प्र.नगरसचिव, प्र. मुख्य विधी अधिकारी इत्यादी विभागांचे कामकाज पहिले आहे.

डॉ शेलार यांनी पुढे म्हटले कि, २३/०२/२०१५ रोजी मला सेवेतून निलंबित करणेत आले. सेवेत पुनर्स्थापना बाबत मी वारंवार अर्ज दिले. ३१/०८/२०१९ रोजी सेवेत विभागीय चौकशी व निलंबित याबाबत जबरी शिक्षा करून पुर्नस्थापना आदेश दिला. त्यानुसार सेवेत पुनर्स्थापित झालो. सदर आदेशात संदर्भ क्र.४
माझे निलंबन ०७/०६/२०१७ असे दर्शविले आहे. माझे निलंबन २३/०२/२०१५ रोजी झालेले आहे. ३१/०८/२०१९ चे दोषपूर्ण आज्ञापत्रक झालेले आहे. असे डॉ शेलार यांनी म्हटले आहे.
सेवेत मूळ नेमणूक खातेमध्ये पुनर्स्थापित  झालेनंतर २४/१०/२०१९ रोजी पदावनत करून सहाय्यक आयुक्त ( अकार्यकारी) मालमत्ता व्यवस्थापन विभागात नेमणूक केली.  महाराष्ट्र शासन आदेश १४/१०/२०११ रोजीचा आहे. प्रकरणी एकाच चुकीसाठी दोनदा शिक्षा झालेली आहे. सेवेमध्ये पुनर्स्थापित ०७/०८/२०२० रोजीच्या तत्कालीन उपआयुक्त सामान्य प्रशासन यांचे पत्रानुसार निलंबन संपुष्टात आणून दिनांक २४/१०/२०१९ रोजी झाल्याचे नमूद आहे. ०४/०९/२०२० रोजीच्या बदली आदेश यामध्येसुद्धा संदर्भ क्र. २ मध्ये महाराष्ट्र शासन आदेश १४/११/२०११ नमूद केले आहे तो महाराष्ट्र शासन आदेश १४/१०/२०११ असा आहे.
डॉ शेलार यांनी पत्रात पुढे म्हटले आहे कि, माझी सेवा निवृत्ती ३०/०६/२०२६ रोजी आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेत वारंवार, अर्ज व विनंत्या केलेल्या आहेत. परंतु आजतागायत पर्यंत कुठलाही अर्जाचा विचार झालेला नाही. पुणे महानगरपालिकेतील “ सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व संबंधित सेवाकांबाबत माझी माझी अध्यक्ष, तक्रार निवारण समिती ( नागरी स्थानिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवा विषय बाबीबाबत) यांचेकडे तक्रार आहे. त्यामुळे मला योग्य तो न्याय मिळावा. अशी मागणी डॉ शेलार यांनी केली आहे.