Dr Rajendra Bhosale IAS | आपण सनदी नोकर आहात महापालिकेचे मालक नाही | महापालिका आयुक्तांवर विवेक वेलणकर कडाडले!

Homeadministrative

Dr Rajendra Bhosale IAS | आपण सनदी नोकर आहात महापालिकेचे मालक नाही | महापालिका आयुक्तांवर विवेक वेलणकर कडाडले!

Ganesh Kumar Mule Sep 27, 2024 1:43 PM

Dr Ambedkar Jayanti 2024 | PMC | आंबेडकर जयंतीच्या तयारीच्या निमित्ताने 13 एप्रिल च्या मध्यरात्री पर्यंत का कामे करत बसता? | महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना परखड सवाल
PMC RTI Nodal Officer | सामान्य प्रशासन विभागाला नकोय माहिती अधिकाराचे काम!
Pune PMC News | अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीला जबाबदार कोण? महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तांची खातेनिहाय चौकशी तर एका उपायुक्तांची बदली! | हेचि फल काय मम तपाला!

Dr Rajendra Bhosale IAS | आपण सनदी नोकर आहात महापालिकेचे मालक नाही | महापालिका आयुक्तांवर विवेक वेलणकर कडाडले!

 

Vivek Velankar – (The Karbhari News Service) – आपण सनदी नोकर आहात, महापालिकेचे मालक नाही. महापालिकेला स्वतःची खाजगी मालमत्ता समजू नका. अशा शब्दात सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचा समाचार घेतला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

जुलै महिन्यात पुण्यात आलेल्या भीषण पूरस्थिती नंतर आपण त्याचा अभ्यास करण्यासाठी व उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सादर केला. तो तीन आठवडे होऊन गेले तरी अजून प्रसिद्ध केला नाही म्हणून वेलणकर यांनी हा अहवाल व त्यावर सुरु केलेली उपाययोजना याची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी अशी मागणी केली होती. त्यावर आयुक्तांनी मिडीया ला सांगितले की हा अहवाल आपण वैयक्तिक कपॅसिटी मध्ये करुन घेतला असून तो प्रसिद्ध करणे आवश्यक नाही. (Pune PMC News)

याबाबत वेलणकर म्हणाले कि आयुक्तांच्या या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करतो. आपण सनदी नोकर आहात महापालिकेचे मालक नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी महापालिकेचा वेळ , पैसा व साधनसामग्री वापरुन हा अहवाल तयार केला असून हे सर्व जनतेच्या करांच्या पैशातून झाले आहे. हा अहवाल पुण्यातील जनतेच्या जीवित आणि वित्त याशी संबंधित असल्याने हा अहवाल व त्यानुसार महापालिका करत असलेल्या उपाययोजना यांची संपूर्ण माहिती मिळण्याचा पुणेकर करदात्या नागरीकांना हक्क आहे. हे आपल्यासारख्या सनदी नोकराला सांगावे लागावे याचे सखेदाश्चर्य वाटते.

—-

आपण आता तरी लोकशाही तत्वांची बूज राखून ज्या जनतेच्या पैशातून हा अहवाल तयार केला गेला, त्या जनतेला हा अहवाल तसेच त्यावरील महापालिकेची कार्यवाही याची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावरून द्यावी.

विवेक वेलणकर , अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0