Dr Rajendra Bhosale IAS | पावसाळी कामाची टेंडर प्रक्रिया करताना ठेकेदार क्षेत्रीय कार्यालय जवळचाच असावा | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे प्रशासनाला आदेश
Pune Municipal Corporation- PMC -(The Karbhari News Service) – पुणे महापालिकेकडून (PMC Pune Municipal Corporation) पावसाळी कामाची टेंडर प्रक्रिया केली जाते. काही वेळेस महापालिकेला अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामुग्रीची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे टेंडर प्रक्रिया करताना ठेकेदार हा संबंधित क्षेत्रीय कार्यालय जवळचाच असावा. असे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी प्रशासनाला दिले आहेत. (Pune PMC News)
आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रात पावसाळी वाहिन्यांची सफाई करणे, मलवाहिन्यांची सफाई करणे, चेंबर सफाई करणे या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या मुख्य खात्याकडून निविदा प्रक्रिया राबविली जाते. यात सदर कामासाठी पावसाळी कालावधीत मनुष्यबळ व साधन सामुग्री पुरविणे याचा देखील समावेश आहे. तथापि आकस्मिक प्रसंगी अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामुग्रीची आवश्यकता भासू शकते.
यासाठी मुख्य अभियंता पथ/ प्रकल्प विभाग, मलनिस्सारण विभाग यांनी आवश्यकतेनुसार तातडीने मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. यासाठी मुख्य खात्यांनी त्यांचेमार्फत सुरू असलेले कामांचे निविदाधारकांकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ व यंत्रसामुग्री याची माहिती त्या-त्या क्षेत्रिय कार्यालयाला उपलब्ध करून द्यावी. अशी निश्चिती करताना तातडीने उपलब्धता व्हावी याकरिता शक्यतो असा निविदाधारक त्या क्षेत्रिय कार्यालय किंवा जवळचा परिसरातील असेल असे पहावे. असे आदेशात म्हटले आहे.