Dr Kalpana Balivant | आरोग्य प्रमुख पदाचा अतिरिक्त पदभार उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे! 

HomeBreaking Newsपुणे

Dr Kalpana Balivant | आरोग्य प्रमुख पदाचा अतिरिक्त पदभार उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे! 

गणेश मुळे May 30, 2024 3:00 PM

PMC Health Officer | आरोग्य प्रमुखांचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे!
Senior Citizens Health | PMC Health Department | शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार पुणे महापालिका
PMC Health Officer | डॉ भगवान पवार पुन्हा पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख | राज्य सरकारकडून आदेश जारी

Dr Kalpana Balivant | आरोग्य प्रमुख पदाचा अतिरिक्त पदभार उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे!

| डॉ भगवान पवारांना करण्यात आले आहे निलंबित

Dr Bhagwan Pawar – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar) यांचे राज्य सरकारकडून निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे आता आरोग्य प्रमुख पदाचा अतिरिक्त पदभार हा उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत (Dr Kalpana Ballivant PMC) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. (PMC Pune Municipal Corporation)
डॉ पवार यांच्याविरुध्द आर्थिक अनियमितता, महिला कर्मचा-यांचा मानसिक व लैंगिक छळ, अधिकारी/कर्मचा यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणे इत्यादी बाबत शासनास विविध गंभीर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील तक्रारी दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी हा पदभार डॉ बळिवंत यांच्याकडे सोपवला आहे.  (PMC Health Department)
डॉ पवार यांची पुणे महापालिकेतून नुकतीच बदली करण्यात आली होती. डॉ पवार यांच्याकडे सहायक संचालक, आरोग्य सेवा (अंधत्व नियंत्रण कार्यक्रम), मुंबई हा पदभार देण्यात आला होता. 10 मार्च 2023 ला डॉ भगवान पवार यांना महापालिका आरोग्य प्रमुख पदी प्रतिनियुक्तीने नियुक्त करण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांनंतर पुन्हा डॉ पवार यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे डॉ पवार यांनी या विरोधात मॅट मध्ये अपील केले होते. मॅट ने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता.
The Karbhari - PMC Health Officer

आरोग्य प्रमुख पदाबाबत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी जारी केलेले आदेश