Dr Babasaheb Ambedkar Jayanti | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे महापालिकेत संयुक्त बैठक | विविध उपाययोजना करण्याचे आदेश
Pune PMC News – (The Karbhari News Service ) – पुणे महानगरपालिकेतर्फे प्रतिवर्षी १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते. सन २०२६ च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरातील जयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलीस प्रशासन व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक सयुंक्त बैठक आज श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पुणे महानगरपालिका (मुख्य इमारत) येथे आयोजित करण्यात आली होती. (Pune Breaking News)
सदर बैठकीस मंजुषा नागपुरे, महापौर पुणे, परशुराम वाडेकर उपमहापौर, आयुक्त नवल किशोर राम महापालिका, ओम प्रकाश दिवटे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) , अनिता इंगळे नगसेविका, अर्चना जगताप नगरसेविका, हिमाली कांबळे पक्षनेत्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आ), निलेश आल्हाट नगरसेवक, सपना छाजेड नगरसेविका, आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी करावयाच्या व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जयंती मंडळांनी केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे व्यवस्था करण्याच्या आदेश देण्यात आले.
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाबाहेर व उद्यानाच्या परिसरात सावली मंडप टाकणेची व्यवस्था करण्यात यावी. तसेच उद्यानामधील फरशीवर मँटींग टाकण्यात यावे.
2. वाहतुकीस अडथळा होऊ नये या दृष्टीने नियोजन करणे.
3. उद्यानातील पुतळा होर्डिंग्जमुळे झाकला जाणार नाही याची काळजी घेणे.
4. अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून ती काढणे.
5. अतिक्रमण विभागाचा एक फिक्स पॉईट ठेवणे.
6. अँम्ब्युलन्स व व्हीआयपी वाहनांसाठी मार्ग मोकळा ठेवणे.
7. उद्यानाच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
8. यासाठी यावर्षी ६ पिण्याचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर वाढविण्यात यावेत.
9. नागरिकांना पिण्याचे पेपर ग्लास पुरविणे.
10. १० एप्रिल २०२६ ते दिनांक १६ एप्रिल २०२६ पर्यंत उद्यान व आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे.
11. उद्यानाकडे जाणारे सर्व रस्त्यांची स्वच्छता राखणे.
12. जीपीओकडून येणाऱ्या रस्त्यालगत मोबाईल टाँयलेट व पोर्टेबल टाँयलेटची व्यवस्था करणे ( ६ पोर्टेबल टाँयलेट- प्रत्येकी ८ सीट्सचे) व वेळोवेळी साफसफाई करून स्वच्छता राखणे.
13. परिसर स्वच्छतेच्या कामी स्वतंत्र टीम तीन शिफ्टमध्ये नियोजित करणे.
14. उद्यान व मेघडंबरीची स्वच्छतेची विशेष काळजी घेणे, सदर ठिकाणी वाहण्यात येणारे पुष्पहार हे वेळेत काढून घेऊन पुतळा नियमितपणे स्वच्छ राखावा.
15. हवामान खात्याने केलेल्या अंदाजानुसार शहरामध्ये उष्माघाताची शक्यता विचारात घेऊन उद्यान परिसरात फिरता दवाखाना- क्लिनिक तसेच २ रुग्णवाहिका, २ डॉक्टर, फार्मासिस्ट व सहाय्यक यांची नियुक्ती करणे.
16. उद्यानाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था, तसेच माईक-साऊंड स्पीकर तसेच जनरेटर बॅकअपची व्यवस्था करण्यात यावी.
17. १४ एप्रिल रोजी उद्यानासमोरील रस्त्यावरील लोखंडी रेलिंग काढण्यात यावे.
18. उद्यान परिसरात तिन्ही शिफ्टमध्ये आवश्यक सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त ठेवावा.
19. उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंगसाठी आवश्यक उपाययोजना करावी.
20. उद्यान परिसरात येणारे व्हीआयपी वाहने व अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका यांचे संचलन(ये-जा) करणेकामी योग्य ती व्यवस्था-मार्गिका तयार करून ठेवणे.
21. उद्यान परिसरातीलरस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत
22. उद्यानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील राडारोडा उचलण्यात यावा.
23. फुटपाथ स्वच्छ ठेवण्यात यावेत, त्यावरील निघालेले ब्लॉक लावून घ्यावेत
24. वरील सर्व काम झाल्याचे खात्री करण्यासाठी खाते प्रमुखांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन कामाची पाहणी करावी.
25. उद्यान परिसरात आवश्यक ती रंगरंगोटी तसेच मेघडंबरीची साफसफाई करणेत यावी.
26. उद्यानातील झाडांचा अडथळा होणार नाही अशा पद्धतीने झाडांचे ट्रिमिंग करण्यात यावे.
27. उद्यानातील परिसर जयंतीपूर्वी व जयंतीनंतर स्वच्छ करून घेण्यात यावा.
28. उद्यानाच्या ठिकाणी अग्निशामक दलाची एक गाडी सर्व साधनांसह ठेवण्यात यावी. तसेच नजिकचे अग्निशामक केंद्र येथे एक गाडी स्टँडबाय सर्व इक्विपमेंटसह तयार ठेवावी.
29. सर्व परिमंडळाचे मा. उपायुक्त आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या मा. सहाय्यक महापालिका आयुक्त यांनी दिलेले काम पूर्ण झाले आहे याची खातरजमा करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करावी.
30. पुणे शहरात ज्या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते तेथे सहाय्यक महापालिका आयुक्त यांनी क्षेत्रीय स्तरावर नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता योग्य ती व्यवस्था करावी.
31. सर्व वॉर्ड ऑफिसर यांनी आपल्या क्षेत्रामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साफसफाई करून घ्यावी व पुरेसा सेवक वर्ग उपस्थित ठेवावा.

COMMENTS