अनुदान मिळवण्यासाठी चुकीची प्रमाणपत्रे सादर करू नका
: पुणे महापालिकेचे नागरिकांना आवाहन
पुणे . महाराष्ट्र शासनाद्वारे कोव्हीड-१९ ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रु. ५०,०००/- सानुग्रह मदत देण्याचे निर्देश दिले असुन त्यानुषंगाने ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त अर्जाचे छानणी करण्याचे काम पुणे म.न.पा.मार्फत सुरु आहे. सानुग्रह मदत मिळविण्यासाठी चुकीची मागणी/चुकीची प्रमाणपत्रे सादर करून अनुदान मिळविण्याचा प्रयत्न केल्यास कलम ५२ कायदा २००५ अंतर्गत २ वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होवू शकतो अशी कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे अशी प्रमाणपत्रे सादर करू नका. असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
कोव्हीड-१९ ने दि.२० मार्च २०२२ पर्यंत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांनी दि.२४ मार्च २०२२ पासून पुढील ६० दिवसांमध्ये सानुग्रह मदतीसाठी अर्ज करावा. तसेच दि.२० मार्च २०२२ नंतर मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांनी मृत दिनांकापासून पुढील ९० दिवसांमध्ये सानुग्रह मदतीसाठी अर्ज करावा.
कोव्हीड-१९ ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांनी रक्कम रु. ५०,०००/- सानुग्रह मदत मिळविण्यासाठी चुकीची मागणी/चुकीची प्रमाणपत्रे सादर करून अनुदान मिळविण्याचा प्रयत्न केल्यास कलम ५२ कायदा २००५ अंतर्गत २ वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होवू शकतो अशी कायद्यात तरतूद
आहे.
आहे.
कोव्हीड-१९ ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांनी mahacovid19relief.in या संकेतस्थळावर रक्कम रु. ५०,०००/- सानुग्रह मदतीसाठी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन विक्रम कुमार, महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी केले आहे.
COMMENTS