Divyang Day | अभ्यास सहलीतून कर्णबधिर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!  | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्तुत्य उपक्रम

Homeadministrative

Divyang Day | अभ्यास सहलीतून कर्णबधिर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्तुत्य उपक्रम

Ganesh Kumar Mule Dec 03, 2024 7:18 PM

World Divyang Day |PMC Pune दिव्यांगाच्या जुन्या योजनात बदल करून नवीन योजना आणणार | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचे आश्वासन 
PMC Special Children School | पुणे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळेत दिव्यांग दिन साजरा!
International Divyang Day | पुणे येथे बाल आनंद मेळावा संपन्न

Divyang Day | अभ्यास सहलीतून कर्णबधिर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

| शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्तुत्य उपक्रम

 

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – आंतरराष्ट्रीय अपंग दिनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने शहरातील दिव्यांग व कर्णबधिर विद्यार्थ्यांनी विविध अभ्यास स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते निमित्त होते ते आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे, हडपसर मतदार संघातील महाराष्ट्र फेलोशिप ऑफ डीफ,पुणे या दिव्यांग व कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच संशोधनावर कार्य करणाऱ्या संस्थेतील विविध वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने “आनंदाची सहल” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद घेत पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देत आपला सहभाग नोंदविला. संपूर्ण सहलीत चैतन्याचे उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले, शारीरिकरित्या सक्षम नसतानाही आपण कोणतेही कार्य करू शकतो याचा दाखला विद्यार्थ्यांनी यावेळी दिला, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की आपल्यातीलच घटक असलेले आपले बंधू-भगिनी दिव्यांग जरी असले तरी त्यांच्याकडे नैसर्गिक रित्या असलेल्या गुण कौशल्यांचा उत्कृष्टरित्या वापर केला तर निश्चितच आपण या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठरणाऱ्या घटकाचा मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकासात उपयोग करू शकतो. अपंग म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या बंधू आणि भगिनींना दिव्यांग म्हणून सन्मान देत हडपसर मधील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना दिव्यांग स्नेही वातावरण तयार व्हावे याकरिता ही प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रमोद नाना भानगिरे म्हणाले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण व पाठबळ मिळावे याकरिता विशेष निधीची ही तरतूद केली जाते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0