खडकवासला धरणातून २५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग
| सकाळी ६वाजता विसर्ग वाढवला
पुणे | शहर आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील धरणामध्ये गेल्या ८ दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे खडकवासला धरण ९४% भरले आहे. खडकवासला धरणाची क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाने मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री १२ वाजले पासून विसर्ग करण्यात येत आहे. रात्री धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 856 क्युसेक विसर्ग वाढवून सकाळी ६ वाजले पासून २५६८ क्युसेक करण्यात येत आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
चार धरणामध्ये १०.७९ टीएमसी पाणी जमा
गेल्या ८ दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची चांगलीच वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणामध्ये १०.७९ टीएमसी पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी याच दिवशी ८.६३ टीएमसी पाणी धरणामध्ये होते. पाऊस चांगला सुरु असल्याने ही वाढ होतच राहिल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान खडकवासला धरणाची क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाने मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री १२ वाजले पासून विसर्ग करण्यात येत आहे. रात्री धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 856 क्युसेक विसर्ग वाढवून ठीक सकाळी ६ वाज्लेपासून २५६८ क्युसेक करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी… असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.