Digital Satbara | डिजिटल सातबारा साठी आता उमंग मोबाईल अॅप

HomeBreaking Newssocial

Digital Satbara | डिजिटल सातबारा साठी आता उमंग मोबाईल अॅप

Ganesh Kumar Mule Jun 06, 2023 2:15 AM

Flood | Maharastra | पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा | मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
The Maharashtra Lokayukta Bill | महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार
Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

Digital Satbara | डिजिटल सातबारा साठी आता उमंग मोबाईल अॅप

Digital Satbara |  महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागाने (Revenue department) संगणकीकृत केलेला व महाभूमी पोर्टल (Mahabhumi portal) द्वारे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असणारा डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ आता केंद्र शासनाच्या उमंग (Umang Mobile App) या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध होवू लागला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Deputy collector Ramdas Jagtap) यांनी दिली. (Digital Satbara)
 राज्यातील ३५ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यातील ४४,५६० महसुली गावातील २ कोटी ५७ लक्ष सातबारा संगणकीकृत करण्यात आले असून त्यापैकी ९९% पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना नं. ७/१२ प्रत्येकी १५ रुपयेच्या डिजिटल पेमेंट भरून कोठूनही व केंवाही उपलब्ध होत आहे त्यासाठी महसूल विभागाने महाभूमी हे पोर्टल ( https://mahabhumi.gov.in/mahabhumilink) विकसित केले असून या पोर्टल वरून डिजिटल ७/१२ उपलब्ध होत होते. आता हीच सुविधा केंद्र शासनाच्या उमंग या मोबाईल अॅपवरून उपलब्ध होणार आहे. हे मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर वरून ANDROID मोबाईल अॅप व अॅप्स स्टोअर वरून अॅपल मोबाईल साठी उपलब्ध करून दिले आहे. (Digital Satbara News)
सध्या राज्यातील दररोज दीड ते दोन लाख नागरिक या डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ फेरफार , खाते उतारे व मिळकत पत्रिकांचा त्यांच्या कार्यालयीन व न्यायालयीन कामकाजासाठी वापर करत आहेत. आज पर्यत महाभूमी पोर्टल वरून साडेपाच  कोटी डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख डाउनलोड करून वापरले असून त्यातून १०५.७२ कोटी रुपयांचा महसूल देखील शासनाला मिळाला आहे. महाभूमी पोर्टल वर आज रोजी २२ लाख नोंदणीकृत वापरकर्ते या सेवांचा लाभ घेत आहेत. यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ची प्रिंट मिळविण्यासाठी महा- ई सेवा केंद्र किंवा झेरोक्स सेंटर यांचा आधार घ्यावा लागत होता परिणामी १५ रुपयांच्या ७/१२ साठी २५/३० किंवा काही ठिकाणी ५० रुपये मोजावे लागत होते. तसेच महाभूमी पोर्टल हे संकेतस्थळ लक्षात ठेवावे लागत होते आता फक्त उमंग मोबाईल अॅप  आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवले का झाले काम. त्यामुळे आपल्या मोबाईलवरच डिजिटल स्वरूपात ७/१२ उपलब्ध होईल व हा ७/१२ प्रिंट न काढताच अन्य व्यक्ती ला अथवा कार्यालयाना पाठविता येईल. परिणामी कागदाचा अनावश्यक वापर कमी होईल याच अॅपवरून आपले खात्यावर पैसे भारता येतील व याच अॅपवरून ७/१२ वरील डॉकूमेंट आय डी वरून त्याची अचूकता पडताळणी करता येईल. (Umang Mobile App News)
—-
  आता डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उमंग मोबाईल अॅपवरून देखील उपलब्ध होणार असल्याने त्याची उपलब्धता अत्यंत सोपी व सहज होईल. परिणामी डिजिटल ७/१२ व महाभूमी प्रकल्प महसूल विभागाची डिजिटल क्रांती आहे हेच दिसून येते.
    – रामदास जगताप, उप जिल्हाधिकारी, पुणे
——
News Title | Digital Satbara |  Umang mobile app now for Digital Satbara