Dhanori Charholi Road | धानोरी-चऱ्होली रस्त्याचे भूमिपूजन; आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पाठपुराव्याला यश
MLA Bapusaheb Pathare – (The Karbhari News Service) – धानोरी येथील स. क्र. ५ ते चऱ्होली या मार्गावर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ३२० मीटर लांबीचा रस्ता अखेर मार्गी लागला आहे. या रस्त्याचे भूमिपूजन वडगावशेरी मतदारसंघांचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते (ता. २५) करण्यात आले. (Pune News)
सदर रस्ता वनविभागाच्या हद्दीत असल्याने त्यासाठी मान्यता मिळवणे मोठा आव्हान ठरले होते. अनेक वर्षांपासून वन विभागाच्या परवानगीअभावी या रस्त्याचे काम रखडले होते. या संदर्भात आमदार बापूसाहेब पठारे यांनी सातत्याने पाठपुरावा करत वन विभागाकडे विविध माध्यमातून मागणी करण्यात आली होती. नुकत्याच वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत पठारे यांनी मांडलेल्या मागणी प्रस्तावावर मान्यता देण्यात आली. तसेच पुणे महानगरपालिकेने वनविभागाच्या जागेचा मोबदला म्हणून १६ लाख ८० हजार रुपये दिल्याचेही सांगितले जाते.
“रखडलेला हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. गणेश नाईक साहेबांशीही या संदर्भात अनेकदा बैठक घेऊन मागणी मांडली होती. अखेरीस आज या रस्त्याचे भूमिपूजन करताना केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे समाधान आहे, असे मत व्यक्त करत पठारे यांनी वनमंत्री गणेश नाईक तसेच वन विभागाचे आभार व्यक्त केले. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना सोयीस्कर वाहतूक व्यवस्था व विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

COMMENTS