मुख्यमंत्र्यांचे नाव न टाकून १२ कोटी मराठी माणसांचा अपमान
: जितेंद्र आव्हाडांची मंगेशकर कुटुंबियांवर टीका
सायंकाळी लता मंगेशकर पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. मात्र, या समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. कारण, पुरस्कार वितरण समारंभाच्या पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव नव्हते. मंगेशकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न टाकून १२ कोटी मराठी माणसांचा अपमान केल्याची टीका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. (Jitendra Awhad said, Mangeshkar family insulted Marathi people)
मंगेशकर कुटुंबीयांमार्फत प्रत्येक वर्षी दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विविध क्षेत्रांतील मान्यवरांना कृतज्ञतापूर्वक पुरस्कार दिला जातो. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मरणार्थ लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) दिला जाणार आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभ मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला.
लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे.#निषेद pic.twitter.com/xVarHhGfou
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 24, 2022
या समारंभाला (Lata Mangeshkar Award Ceremony) विविध मान्यवर उपस्थित होते. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. राज्यातील भाजप-शिवसेनेतील (BJP) वाढता वाद पाहता मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला न येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. तसेच निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव नसल्याने त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे.अशात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करून मंगेशकर कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. ‘लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याचं मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे’ असे ट्विट त्यांनी केले.
COMMENTS
*मंगेशकर कुटुंबियांचा जाहीर निषेध.* मंगेशकर कुटुंबीयांनी महाराष्ट्र राज्याची जाहीर माफी मागावी.*
*महाराष्ट्र राज्याची व देशाची खऱ्या अर्थाने गानकोकिळा या सुमन कल्याणपुरकर च आहेत.. विठ्ठल पवार राजे. जय किसान.*
*मंगेशकर कुटुंबियांचा जाहीर तीव्र शब्दात आम्ही निषेध.
यापुढे मंगेशकर कुटुंबीयांच्या यापुढे एकही गाणे आणि संकेत ऐकणार नाही…. शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा निर्णय घेण्यात, *
महाराष्ट्र सरकारने लता मंगेशकर च्या नावाने बांधत असलेले स्मारक रद्द करून त्या ठिकाणी सुमन कल्याणपुरकर यांचे नाव देऊन ते बांधाव.
महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मंगेशकर कुटुंबीयांनी पुरस्काराच्या पत्रिकेमध्ये प्रथम नाव टाकणे आवश्यक होते, नव्हे तर टाकायलाच हवी होते.
परंतु मंगेशकर कुटुंबीयांनी जी त्यांची प्रवृत्ती, औकात दाखवलेली ती अत्यंत भयानक असून निंदनीय तर आहेच आहे परंतु महाराष्ट्र सरकारने या पुढे मंगेशकर कुटुंबियांना खेटरा जवळ देखील उभे करू नये, इतकी घाणेरडी प्रवृत्ती या कुटुंबीयांनी दाखवून दिलेली आहे खरं तर मंगेशकर कुटुंबीय हे मागतकरी कुटुंबीय आहे त्यांनी महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र सरकार कडून अनेक जमिनी अनेक शासकीय योजना लाटलेले आहेत, अखेर ते औकातीवर आलेच.
त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव पत्रिकेमध्ये न टाकता महाराष्ट्र राज्याच्या तमाम 13 कोटी जनतेचा अवमान केलेला आहे आणि तो कधीही माफ न होणारा नाही
म्हणून आम्ही मंगेशकर कुटुंबियांचा जाहीर निषेध करतो नव्हे तर मंगेशकर कुटुंबीयांची गाणी देखील यापुढे ऐकनार नाही. आम्ही मंगेशकर कुटुंबियांचा जाहीर निषेध करतो.
*यापुढे आम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची व देशाची गानकोकिळा असलेल्या सुमन कल्याणपुरकर यांचे गित, संगीत ऐकू..*
तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेला देखील आवाहन करतो की मंगेशकर कुटुंबीयांच्या गाण्यावर व त्यांच्या संगीतावर महाराष्ट्र राज्यातल्या तमाम जनतेने बहिष्कार घालावा कारण ते तितक्याच लायकीचे आहेत..!
कारण त्यांनी आमच्या महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्री यांचा सो महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान केलेला आहे.
धन्यवाद.
जय किसान, जय महाराष्ट्र, जय जवान. जय भारत.