PMC Employees Transfer | बदल्या होऊनही महापालिका कर्मचाऱ्यांना बदली खात्यात जावेसे वाटेना!
| बदली खात्यात हजर न झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी
| अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी
PMC Porperty Tax Department – (The Karbhari News Service) – कर आकारणी कर संकलन विभागाकडील (PMC Property tax department) लेखनिकी संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या होऊन अद्याप बदली खात्यात हजर न झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde Pune Congress) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता व लेखनिकी संवर्गातील वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या झालेल्या आहेत. बदलीनुसार प्रत्यक्ष कामकाजाच्या खात्यामध्ये परस्पर खातेस्तरावर बदल केल्यास संबंधित सेवक व खातेप्रमुख यांचे विरुद्ध शिस्त भंगाची कार्यवाही करण्यात येईल असेआज्ञापत्रात नमूद आहे. असे असतानाही अद्याप काही अर्थपूर्ण खात्यातील अधिकारी व कर्मचारी अद्याप बदली खात्यात खातेप्रमुख यांच्या तोंडी सांगण्यावरून हजर झालेले नाहीत, वस्तुस्थिती आहे. तसेच काही अधिकारी व कर्मचारी हे बदली खात्यात रुजू न होता आहे त्याच खात्यात काम करणेबाबत अति.महा.आयुक्त व महापालिका आयुक्त स्तरावर मान्यता घेण्याच्या अर्थपूर्ण प्रयत्न खातेप्रमुख स्तरावरून करीत आहे असे समजते. अशा प्रकारे खातेप्रमुखांनी देखील काही विशीष्ट अधिकारी व कर्मचारीच आपल्या खात्यात काम करू शकतात, बदली करून आलेले सेवक काम करू शकत नाहीत असा पायंडा आपल्या खात्यात करू नये. असे अरविंद शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील अभियांत्रिकी कनिष्ठ अभियंता व लेखनिकी संवर्गातील वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक या पदावरील सेवक बदली खात्यात रुजू झाले आहे अगर कसे याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाकडून अहवाल आयुक्त स्तरावर घेण्यात यावा. तसेच जे अधिकारी व कर्मचारी अद्याप संदर्भांकित आज्ञापत्रानुसार बदली खात्यात रुजू झालेले नाहीत त्यांचेवर आज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी. तसेच काही अधिकारी व कर्मचारी हे बदली खात्यात रुजू न होता आहे त्याच खात्यात काम करणेबाबत आपले स्तरावर मान्यता दिल्यास संदर्भांकित बदली प्रक्रियेला अर्थ राहणार नाही. असे ही शिंदे यांनी म्हटले आहे.
COMMENTS