Deenanath Mangeshkar Hospital | महापालिकेकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयास दिलेल्या सर्व  सवलती रद्द करण्याची मागणी 

Homeadministrative

Deenanath Mangeshkar Hospital | महापालिकेकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयास दिलेल्या सर्व  सवलती रद्द करण्याची मागणी 

Ganesh Kumar Mule Apr 04, 2025 8:20 PM

Dr Dhananjay Kelkar | वैद्यकीय आयोगाने डॉ. केळकर यांची मान्यता रद्द करावी – अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ कार्यकर्ते विशाल विमल यांची मागणी
Deenanath Mangeshkar Hospital Pune | पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल
NCP – SCP  Pune | दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामार्फत निषेध आंदोलन 

Deenanath Mangeshkar Hospital | महापालिकेकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयास दिलेल्या सर्व  सवलती रद्द करण्याची मागणी

| कॉंग्रेस कडून करण्यात आली मागणी

 

Pune Congress – (The Karbhari News Service) – पुणे मनपाने (Pune Municipal Corporation – PMC) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयास (Deenanath Mangeshkar Hospital)  दिलेल्या सर्व कर सवलती, नॉन कमर्शियल दराने दिलेल्या मूलभूत सोयी सुविधा रद्दबातल करण्याची मागणी पुणे कॉंग्रेस (Pune Congress) कडून करण्यात आली आहे. याबाबत कॉंग्रेस ने महापालिका आयुक्त यांना पत्र दिले आहे.  (Pune Congress)

पुणे कॉंग्रेस च्या निवेदना नुसार  पुणे महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना ससून रुग्णालयावर येणारा ताण कमी करण्यासाठी व नागरिकांना सवलतीच्या दारात दर्जेदार उपचार घेण्यात यावे, यासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला तत्कालीनकाळी देखील अब्जावधी कोटी रूपयांचे मूल्य असलेली जागा नाममात्र दराने सेवाभावी वृत्तीने नागरिकांना सेवा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतून पुणे मनपा मुख्य सभेने एकमताने दिली होती. तसेच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नॉनकमर्शियल दराने ड्रेनेज, पाणी इ. सुविधा देण्यात आलेल्या आहेत. परंतु पुणेकरांना विशेषत: दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अनुभव अतिशय वाईट येत आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालय कमर्शियल दरानेच व्यवसाय करीत असून सर्वसामान्यांना येथे अतिशय हिन दर्जाची वागणूक देण्यात येते. सामान्य रुग्णांना लाथाडून फक्त श्रीमंताकरीता पायघड्या घालाणारे रुग्णालय अशी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची प्रतिमा राज्यभरात झालेली आहे. नुकत्याच एका गर्भवती महिलेस तब्बल १० लाख रूपये भरल्याशिवाय अॅडमिट करून घेणार नाही अशी ताठर भूमिका घेतल्याने जुळ्या बाळांना जन्म देऊन मृत्यूस सामोरे जाण्याची दुर्दैवी वेळ सावित्रीबाईंच्या पुणे शहरात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नीच संचालकांमुळे आली. असा वाईट अनुभव येण्याची ही पहिलीच वेळ नसून अनेक वर्षांपासून सामान्य कॅटेगिरीतील नागरिक वारंवार तक्रार करीत आहेत. सवलतीच्या दराने रुग्ण तपासणी जर दिनानाथवाले करतच नसतील तर मनपाने त्यांना कोट्यावधी रूपयांची कर सवलत व नॉन कमर्शिलय दराने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची कोणतीही गरज शिल्लक राहत नाही. असे कॉंग्रेस ने म्हटले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, रूग्णालयाच्या पैसेलोलुप वृत्तीने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. (दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील दुर्दैवी घटना तर समोर आली पण पुण्यातील सर्वच धर्मादाय KEM, रुबी, जहांगीर, इनलॅक्स बुधरानी, सहयाद्री या सर्व हॉस्पिटलचा मनमानी कारभार वाढला आहे रुग्णालय प्रशासन अतिशय उतमात करीत आहेत. गरीब गरजू नागरिकांची बिले कमी करायला दहा वेळा फोन करावा लागतो. ठराविक लोकांची एजेट गिरी चालू असते, गेल्या १० वर्षांचा यांचा आर्थिक अहवाल तपासला तरी कितीतरी हजार कोटींचा भ्रष्टाचार सामोरं येईल. )

पुणे मनपाच्या वतीने आजतागायत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयास मनपाने दिलेल्या सर्व सोयी सवलती यांचे कमर्शियल दराने आकारणी करून सदर रक्कम मनपाने रुग्णालयाकडून वसूल करावी आणि सदर रुग्णालयास दिलेला सवलतीचा दर्जा तातडीने काढून घेण्यात यावा. अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमहापालिका आयुक्त यांना केली आहे.