DA Difference | PMPML Pune | PMPML च्या कर्मचाऱ्यांना ५ महिन्याचा महागाई भत्त्याचा फरक मिळणार!
| पीएमटी कामगार संघ इंटक ची माहिती
DA Difference | PMPML Pune | पुणे | PMPML च्या कर्मचाऱ्यांना पुणे महापालिका (PMC) आणि पिंपरी महापालिका (PCMC) प्रमाणे सानुग्रह अनुदान (Bonus), बक्षीस देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना पाच महिन्याचा 4% प्रमाणे महागाई भत्त्याचा फरक (DA Difference) ऑक्टोबर पॅड इन नोव्हेंबरच्या मिळणाऱ्या वेतनात देण्याचे मान्य केले आहे. अशी माहिती पीएमटी कामगार संघ इंटक चे राजेंद्र खराडे (अध्यक्ष), नुरुद्दीन इनामदार (जनरल सेक्रेटरी) यांनी दिली. (PMPML Emplyoees Bonus)
राजेंद्र खराडे (अध्यक्ष), नुरुद्दीन इनामदार (जनरल सेक्रेटरी) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार मान्यता प्राप्त पीएमटी कामगार संघ इंटक बरोबर सानुग्रह अनुदान व बक्षीस बाबत झालेला करार, औद्योगिक न्यायालय व मे.उच्च न्यायालयात संघटनेच्या बाजूने झालेला निकाल संघटनेने केलेले कायदेशीर पत्रव्यवहार व पाठपुरावा याचा सकारात्मक विचार करून इंटक संघटने बरोबर गुरुवार रोजी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांच्याबरोबर झालेली बैठक त्यात सकारात्मक चर्चे नुसार बुधवार रोजी तातडीने घेतलेली संचालक मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांच्या प्रशासकीय मान्यतेनुसार परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना 8.33% सानुग्रह अनुदान व बक्षीस रक्कम 21000 देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कामगार यांची दिवाळी गोड होणार आहे.
त्याच बरोबर 1 जानेवारी 2023 ते मे 2023 पाच महिन्याचा 4% प्रमाणे महागाई भत्त्याचा फरक ऑक्टोबर पॅड इन नोव्हेंबरच्या मिळणाऱ्या वेतनात देण्याचे मान्य केले आहे. असे राजेंद्र खराडे (अध्यक्ष), नुरुद्दीन इनामदार (जनरल सेक्रेटरी) यांनी सांगितले.
———