NCP Youth | pune police | धाडसी पोलीस अधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी युवक तर्फे सन्मान

HomeपुणेBreaking News

NCP Youth | pune police | धाडसी पोलीस अधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी युवक तर्फे सन्मान

Ganesh Kumar Mule Jan 02, 2023 7:45 AM

NCP Youth : राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे डहाणूकर कॉलनी आणि वनदेवी चौकात २ शाखांचे उद्घाटन
NCP Youth | आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश
Traffic problem in Kothrud : Youth NCP : कोथरूड मधील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादी चे पोलिसांना साकडे

धाडसी पोलीस अधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी युवक तर्फे सन्मान

सिंहगड रोड परिसरात कोयता हातात घेऊन दहशत माजवत असलेल्या गुंडाला पोलिसांनी वेळेत गाठून उत्तम चोप दिल्याची घटना परवा घडली व समजमध्यामांमध्ये जबरदस्त गाजली. या धाडसी व कर्तव्यदक्ष पोलिसांचा म्हणजेच अक्षय इंगवले व धनंजय पाटील यांचा राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी नागरिकांच्या वतीने सत्कार केला.

अश्या जिगरबाज पोलिसांची समजाला अत्यंत गरज असल्याचे व अश्या व्यक्तिमत्त्वांचा आदर करून पोलिसांचा मनोबल वाढवण्याची गरज असल्याचे गुरूनानी यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले. या प्रसंगी प्रकाश नगरे, राजेश बाच्चेवर, निलेश बच्चेवार व प्रीतम पायगुडी यांच्यासह राष्ट्रवादी चे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.