सचिवालय कक्षात महापालिकेचा समन्वय अधिकारी
| नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष
पुणे | राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावरील कामे इत्यादी बाबत प्राप्त होणारी निवेदने, अर्ज मुख्यमंत्री सचिवालय मुंबई येथे स्वीकारून संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविणेत येतात. मात्र यामध्ये अधिक लोकाभिमुकता पारदर्शकता व गतिमानता आणणेकामी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांचेशी समन्वय साधण्याकरीता महापालिका अधिकाऱ्यांची समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागातील प्रशासन अधिकारी प्रकाश मोहिते यांची याकामी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त यांनी जारी केले आहेत. समन्वय अधिकारी यांनी संबंधित कक्षाशी संपर्क साधून पुढील करावे. असे आदेशात म्हटले आहे.