Congress : PMC Election : परिवर्तन रॅलीद्वारे काँग्रेस फुंकणार महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग!

HomeBreaking Newsपुणे

Congress : PMC Election : परिवर्तन रॅलीद्वारे काँग्रेस फुंकणार महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग!

Ganesh Kumar Mule Feb 04, 2022 2:38 PM

Pune : Road Misery : Congress : रस्त्यांची दुर्दशा आणि भाजपची तारीख पे तारीख : शहर कॉंग्रेस आक्रमक 
Pune Congress | राजकीय गुन्हे सरसकट माफ करावे, ही शहर काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही | शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचे स्पष्टीकरण 
Congress’s anti-toll movement | काँग्रेसचे टोलविरोधी आंदोलन – आ. पृथ्वीराज चव्हाण

परिवर्तन रॅलीद्वारे काँग्रेस फुंकणार महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग!

 

     पुणे : महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने(Pune congress) जय्यत तयारी सुरू केली आहे. डिजीटल सभासद नोंदणीच्या अभियानामार्फत पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना भेटून काँग्रेस पक्षाचे सभासद करीत आहेत. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे महानगरपालिकेमध्ये(PMC) परिवर्तन करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे विद्यापीठ चौक ते काँग्रेस भवन पर्यंत ‘‘परिवर्तन रॅली’’ आयोजित करण्यात आली आहे.

उद्या ५ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  नानाभाऊ पटोले यांचा पुणे दौरा आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. गेली ५ वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या ५ वर्षात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुणेकरांची अपेक्षा भंग केली. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे महानगरपालिकेमध्ये परिवर्तन करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे विद्यापीठ चौक ते काँग्रेस भवन पर्यंत ‘‘परिवर्तन रॅली’’ आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व आघाडी संघटना व विभागाचे प्रमुख व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर काँग्रेस भवनच्या पटांगणामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  नानाभाऊ पटोले हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्‍यास काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, आजी-माजी आमदार, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

     या मेळाव्‍यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रोत्साहन व उर्जा मिळणार आहे. या मेळाव्‍याच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या निवडणीचे रणशिंगे फुंकणार आहे. असे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी  पत्रकाद्वारे सांगीतले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0