काम न करताच होत आहे तक्रारींचे निराकरण | आता प्रशासन अधिकाऱ्यांना धरले जाणार जबाबदार
तक्रार व्यवस्थापन प्रणालीमध्ये रिसेप्शन युजरची जबाबदारी प्रशासन अधिकारी यांना देणेबाबत.
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत तक्रार व्यवस्थापन प्रणालीची
अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या तक्रार प्रणालीमध्ये विविध सोशल मीडिया चॅनेल्सद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारी मुख्य खाते व क्षेत्रीय कार्यालयाकडील रिसेप्शन युजर यांच्या लॉगिनला प्राप्त होतात. सदर तक्रारीवर पुढील कार्यवाही करणेसाठी प्रत्येक मुख्य खाते व क्षेत्रीय कार्यालय यांजकडे रिसेप्शन युजर यांची नेमणूक करणेत आलेली आहे. तक्रार व्यवस्थापन प्रणालीमध्ये रिसेप्शन युजरची अतिशय महत्वपूर्ण भूमिका आहे. विभागाकडे प्राप्त होणाऱ्या ऑनलाईन तक्रारी रोजच्या रोज संबंधित सेवकांना Assign करणे तसेच तक्रार प्रणालीमध्ये मुख्य खाते / क्षेत्रीय कार्यालयाकडील कामाच्या व्यवस्थेनुसार Ladder मध्ये प्रभागनिहाय, क्षेत्रीय कार्यालय निहाय अधिकारी अद्यावत करणे इत्यादी महत्वाची कामे रिसेप्शन युजर मार्फत करण्यात येतात.
तक्रार प्रणालीमध्ये सध्याच्या रिसेप्शन युजर मार्फत त्यांचे लॉगीन मधील तक्रारी वेळेवर L1 अधिकारी यांना पाठविल्या जात नसल्यामुळे तक्रारी निरस्त करण्यासाठी बराच कालावधी लागत आहे. तसेच संबंधित L1 अधिकारी यांचेकडून तक्रार निरस्त करताना व्यवस्थित शेरा नमूद केला जात नाही, नागरिकाशी संपर्क केला जात नाही, तक्रार काम नm करताच निराकरण केल्याचे निदर्शनास येत आहे. आता तक्रार व्यवस्थापन प्रणालीच्या रिसेप्शन युजरची जबादारी प्रशासन अधिकारी यांचेकडे सोपविण्यात येत आहे. त्यानुसार सर्व विभागांच्या प्रशासन अधिकारी यांनी रिसेप्शन युजरची सर्व जबाबदारी पार पाडावी व त्यांच्या अखत्यारीत उपलब्ध कर्मचाऱ्यांमार्फत सदर कामकाज करून घ्यावे. सदर बाबी नमूद कामकाजाची शहानिशा सर्व प्रशासन अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे. संबंधीत अधिकारी यांनी दैनंदिनरित्या सकाळी 11 वाजता व संध्याकाळी 5 वाजता रिसेप्शन युजर यांचे लॉगिन मधील सर्व तक्रारी संबंधीत L1 अधिकारी यांना Assign केल्याची खातरजमा करावी. सदर तक्रारी रिसेप्शन युजर यांचे लॉगिनला प्रलंबित राहिल्यास त्याची जबाबदारी विभागाकडील प्रशासन अधिकारी अथवा अधीक्षक यांची राहील.