महापालिका भवन, क्षेत्रिय कार्यालयात येण्यास नागरिकांना प्रतिबंध!
: अत्यावश्यक काम आणि दोन डोस पूर्ण झालेल्या लोकांनाच दिला जाणार प्रवेश
पुणे : शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसतो आहे. खास करून omicron बाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने आवश्यक उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आणि गर्दी होऊ नये म्हणून महापालिका भवन, क्षेत्रिय कार्यालयामध्ये नागरिकांना मज्जाव करण्यात आहे. अत्यावश्यक काम असेल आणि लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी हे आदेश जारी केले आहेत.
: असे आहेत आदेश
कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना विषाणूचा नवा प्रकार ‘ ओमायक्रॉन ( Omicron ) ‘ आढळून आला असून व जागतिक आरोग्य संघटना (W.H.O. ) ने सदर विषाणू प्रसारास Variant of Concern म्हणून जाहीर केले आहे. विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये यास्तव या विषाणू विरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याने पुणे महानगरपालिका स्तरावर खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका मुख्य इमारतीत/विविध परिमंडळ/विविध क्षेत्रिय कार्यालयात येणा-या अभ्यांगत/नागरिकांना (निर्वाचित सदस्य, पदाधिकारी वगळून) अत्यावश्यक काम वगळता कार्यालयात येण्यास प्रतिबंधक करण्यात येत आहे. तथापि, बैठकीकरीता निमंत्रित केलेल्या नागरिकांना संबंधित विभाग/कार्यालय प्रमुख यांनी प्रवेश पत्र देण्याची व्यवस्था करावी.
केवळ कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा (डोस) पूर्ण झालेल्या अभ्यांगत/ नागरिकांनाच खात्री करून प्रवेश देण्यात यावा.
अभ्यांगत/नागरिक इ. यांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता आपले म्हणणे , तक्रार , सूचना या लेखी स्वरुपात ईमेलद्वारे संबंधित विभागास पाठवावे.
COMMENTS