Chhatrapati Shivaji Maharaj | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक : छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक

NCP-SCP Agitation

HomeBreaking News

Chhatrapati Shivaji Maharaj | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक : छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक

Ganesh Kumar Mule Aug 27, 2024 6:28 PM

Shivaji Maharaj Jayanti | शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Shivrajyabhishek Din  | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव पाटील यांच्या ऐतिहासिक वाड्यात फडकवला तिरंगा ध्वज
Shivgarjana Mahanatya  | शिवगर्जना महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद |  महानाट्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन तास उपस्थिती

Chhatrapati Shivaji Maharaj | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक : छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक

 

NCP-SCP – ((The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मतांवर डोळा ठेवून राजकोट, सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे घाईघाईत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) उभारण्यात आला. पंतप्रधान नरेंद मोदी (PM Narendra Modi)  यांच्या हस्ते अनावरण करून त्याचा मोठा इव्हेंट करण्यात आला. हा पुतळा काल अचानक कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP-Sharadchandra Pawar) पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक घालून त्यांची माफी मागण्यात आली. (Pune News)

लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून नरेंद्र मोदींच्या हस्ते सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे घाईघाईत अनावरण करण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या या स्वार्थी राजकारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दर्जा खालावला व काल दुर्दैवाने हा पुतळा कोसळला.

 

“भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1961 साली प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला, महाराष्ट्रात असंख्य ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे असंख्य पुतळे दिमाखात उभे आहेत, जगातील बहुतांश देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मात्र, आजपर्यंत एकही पुतळा कोसळण्याची घटना घडली नाही.
दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच ही लाजिरवाणी घटना घडली.” अशी प्रतिक्रिया देत प्रशांत जगताप यांनी संताप व्यक्त केला.

पुतळ्याचे अनावरण करताना त्याचे संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदींना देणारे सत्ताधारी पुतळा कोसळल्यानंतर मात्र देशाच्या नौदलावर याची जबाबदारी ढकलत आहेत. मुख्यमंत्री म्हणताय की वेगवान वाऱ्यामुळे पुतळा कोसळला, एक मंत्रिमंडळ की पुतळा कोसळला ही घटना कदाचित एखाद्या चांगल्या कारणासाठी घडली असेल, मोदींचे गुणगान गाताना न थांबणारे राज्याचे दोन-दोन उपमुख्यमंत्री या घटनेचा साधा निषेधही करायला तयार नाहीत हे महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे असेही प्रशांत जगताप म्हणाले.

असं नालायक सरकार महाराष्ट्राने निवडून दिलं व यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अपमान सहन करावा लागला म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक घालून त्यांची माफी मागण्यात आली. अशी चूक पुन्हा घडणार नाही व हे नालायक सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही हा निश्चय यावेळी एकमुखाने करण्यात आला.

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या सरकारच्या काळया कृत्यांची, भ्रष्टाचाराची, हुकूमशाहीची, दडपशाहीची, महाराष्ट्र द्वेषाची दहीहंडी फोडण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत या तिघाडी सरकारच्या पापांचा घडा जनता फोडणार हा विश्वासही यावेळी सर्वांनी व्यक्त केला. आंदोलन प्रसंगी प्रशांत जगताप , किशोर कांबळे, स्वाती पोकळे, काकासाहेब चव्हाण, रोहन पायगुडे, विक्रम जाधव , रत्नप्रभाताई जगताप , फाईम शेख, रमीज सय्यद, कणव चव्हाण, संजय गाडे, नितीन जाधव आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0