Chhath Puja 2025 | छटपूजासाठी कालव्यातून जादा पाणी सोडावे | माजी आमदार मोहन जोशी यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

HomePolitical

Chhath Puja 2025 | छटपूजासाठी कालव्यातून जादा पाणी सोडावे | माजी आमदार मोहन जोशी यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

Ganesh Kumar Mule Oct 26, 2025 4:23 PM

CNG Vehicles | सीएनजी वाहन चालकांसाठी मोठी बातमी |सीएनजी पंप चालक मध्यरात्रीपासून संपावर
Shri Ram Lalla  Pran pratishta Holiday | श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारीला पुणे महापालिकेला सुट्टी! 
Dr Manmohan Singh | डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थकारणाची दिशा बदलली – पृथ्वीराज चव्‍हाण, माजी मुख्यमंत्री

Chhath Puja 2025 | छटपूजासाठी कालव्यातून जादा पाणी सोडावे | माजी आमदार मोहन जोशी यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

 

Mohan Joshi Congress – (The Karbhari News Service) – उत्तर भारतीयांच्या छटपूजेसाठी खडकवासला धरणातून जादा पाणी सोडावे,अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ,माजी आमदार मोहन जोशी यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आज रविवारी केली. (Pune News)

उत्तर भारतीय लोकांमध्ये छटपूजेला अनन्य साधारण महत्व असते.येत्या दि. २७ आणि २८ रोजी छटपूजा आहे.नदी किंवा कालव्याकाठी जमून सूर्याला अर्घ्य दिले जाते.पुण्यात उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत.हडपसर,वानवडी, औंध,बालेवाडी अशा ठिकाणी नदी किंवा कालवा यासाठी जमून अर्ध्य दिले जाते.याकरिता कालव्यात पाणी सोडणे गरजेचे आहे.हे लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि खडकवासला धरणातून कालव्यात दोन दिवसांकरिता पाणी जादा सोडावे अशी मागणी केली. मंत्री महोदयांनी मागणी मंजूर केली.त्यानुसार आता छटपूजेसाठी पाणी उपलब्ध राहील,असे मोहन जोशी यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: