Chandani Chowk Bhugaon Road | चांदणी चौक – भूगाव मार्गासाठी २०३ कोटींचा  पुनर्विकास आराखडा!

Homeadministrative

Chandani Chowk Bhugaon Road | चांदणी चौक – भूगाव मार्गासाठी २०३ कोटींचा  पुनर्विकास आराखडा!

Ganesh Kumar Mule Dec 01, 2025 8:57 PM

Make STP Plant mandatory if generating more than 10 CMD domestic sewage |  Demand to PMC Commissioner
Mahavikas Aghadi Agitation | महाविकास आघाडीच्या वतीने मेट्रो मार्गांचे उद्घाटन !
Pune Nashik Highway | पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

Chandani Chowk Bhugaon Road | चांदणी चौक – भूगाव मार्गासाठी २०३ कोटींचा  पुनर्विकास आराखडा!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – चांदणी चौक-भूगाव मार्गाच्या पुनर्विकासाला आता गती मिळणार आहे. पुणे महापालिकेने या मार्गासाठी तब्बल २०३.६१ कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. याला इस्टीमेट कमिटी ची तत्वत: मान्यता मिळाली आहे. हिंजेवाडी आयटी पार्क, मुंबई–गोवा महामार्ग आणि प्रस्तावित पीएमआरडीए रिंगरोड या तिन्ही महत्त्वाच्या जोडण्या लक्षात घेता हा प्रकल्प पश्चिम पुण्याचा ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याचा महापालिकेने दावा केला आहे. (PMC Projects Department)

या मार्गावरील वाहतूक कोंडी नेहमीची होऊन बसली आहे. सध्या आसपासचा परिसर अंदाजे ९० हजार लोकसंख्येचा असून पुढील काही वर्षांत हा आकडा दोन ते तीन लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत वाहतूक नियोजन तातडीने करावे लागणार आहे. या दृष्टीने प्रकल्पाच्या डिटेल प्लॅनिंगसाठी मेसर्स पेंटॅकल कन्सल्टंट्स प्रा. लि.ची ३० जुलै  रोजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात कामासाठी १६ कोटींची तरतूद करण्यात आली असून फेज १ अंतर्गत ६७.८५ कोटी आणि फेज २ अंतर्गत १३५.७६ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत.

या रस्त्याची नियमानुसार रुंदी ६० मीटर असायला हवी; मात्र प्रत्यक्षात ती केवळ १० मीटर आहे. मर्यादित रुंदीमुळे सततची कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढत असताना, यावर उपाय म्हणून तीन महत्त्वाच्या चौकांवर उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पीव्हीपीआयटी कॉलेज चौकातील प्रस्तावित ग्रेड सेपरेटर ४३० मीटर लांबीचा असून १२० मीटर भाग आरसीसी स्ट्रक्चरचा असेल. २३.२ मीटर रुंदीच्या या स्ट्रक्चरसाठी २७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

एम्ब्रोसिया चौक व पाटील नगर चौकातील उड्डाणपूल ८७० मीटर लांबीचा असणार असून त्यातील ५४४ मीटर भाग आरसीसी असेल. २३.२ मीटर रुंदीच्या या पुलासाठी सुमारे ८२ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर चांदणी चौक ते भूगावदरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीय कमी होईल, असा दावा आहे. त्याशिवाय राम नदीवरील ३० मीटर लांबीचा आणि ७० मीटर रुंदीचा पूल उभारण्यात येणार असून नदीपात्र ओलांडताना होणारी कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पिरंगुट, रोहा, भागड, माणगावसारख्या औद्योगिक भागांना आणि हिंजेवाडी आयटी पार्कला जोडणारा हा मार्ग विकसित झाल्यास पश्चिम पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल दिसतील.


हिंजेवाडी आयटी पार्क, मुंबई–गोवा महामार्ग आणि प्रस्तावित पीएमआरडीए रिंगरोड या तिन्ही महत्त्वाच्या जोडण्या लक्षात घेता तसेच ४०० एकर चा परिसर लक्षात घेता चांदणी चौक-भूगाव मार्गाच्या पुनर्विकासाला गती देणे गरजेचे आहे. प्रकल्पाची जवळपास ७४ टक्के जागा आमच्या ताब्यात आहे. आगामी महिन्याभरात आम्ही तिथले विकसक, नागरिक यांच्या बैठका घेऊन उर्वरित जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आम्ही निविदा प्रक्रिया सुरु करणार आहोत.

  • दिनकर गोजारे, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग 

——–

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: