Corporator Abdul Gafoor Pathan Vs Anuradha Shinde : नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून रद्दबातल

HomeBreaking Newsपुणे

Corporator Abdul Gafoor Pathan Vs Anuradha Shinde : नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून रद्दबातल

Ganesh Kumar Mule Mar 03, 2022 12:53 PM

Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | The exam on 28th January has been postponed!
Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदोन्नती | 28 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली! | पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय 
PMC Pune Additional Commissioner | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावर उपायुक्त रमेश शेलार यांचा दावा | नाव डावलल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून रद्दबातल

: अनुराधा मदनराव शिंदे यांनी पठाण यांच्या निवडीला दिले होते आव्हान

पुणे : कोंढवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांचे दगडफोडू जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्दबादल केले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून त्यास तीन महिन्यात पुणे विभागीय जात पडताळणी समितीने या प्रमाणपत्राची फेर पडताळणी करून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोंढवा येथील प्रभाग क्र. 27 मधून गफूर पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती त्यांच्या निवडीला प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवर अनुराधा मदनराव शिंदे, हुसेन खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस. जी. डीगे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने पठाण यांचे 17 जुलै 2017 रोजी दिलेले जात पडताळणी प्रमाणपत्र रद्दबातल केले.

न्यायालयाने हा निर्णय देताना विभागीय जात पडताळणी समिती, दक्षता पथक ,गफूर पठाण, तत्कालीन जुन्नर प्रांताधिकारी आणि दगडफोडू असल्याचा दाखला देणाऱ्या बेल्हे येथील बेल्हेश्वर मजूर सहकारी संस्थेवर कडक ताशेरे ओढले आहेत. हा निर्णय देताना उच्च न्यायालयाने अनुराधा मदनराव शिंदे यांनी दाखल केलेले सर्व पुरावे ग्राह्य धरून पठाण यांचा संपूर्ण युक्तिवाद फेटाळून लावला.

पठाण यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवताना दगडफोडू मुसलमान असल्याचा दावा केला होता. मात्र हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पठाण यांनी खोटी कागदपत्रे सादर केली. ती न्यायालयात टिकू शकली नाहीत. त्यांचे वडील व चुलते गवंडी तथा दगडफोडू असल्याचा बेल्हे श्वर मजूर सहकारी संस्थेचा जोडलेला 1985 मधील दाखला हा संगणकावर म्हणजेच फॅब्रिकॅटेड तयार केला असल्याचा ठपका न्यायालयाने निकालपत्रात ठेवला आहे.

दक्षता पथकाकडून हलगर्जीपणा करण्यात आला तसेच तत्कालीन जुन्नर उपविभागीय अधिकारी पांढरे यांनी अपुऱ्या कागदपत्रांवर जातीचा दाखला दिला असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. या प्रकरणात पठाण यांनी सादर केलेला निकाहनामा देखील बनावट असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. अनुराधा मदनराव शिंदे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पठाण यांनी दाखले मिळवली असून त्यासाठी अधिकारी आणि पडताळणी समितीने संगणमत केले असल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने गफूर पठाण यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्दबादल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला या प्रकरणी जात पडताळणी समितीने येत्या तीन महिन्यात सुनावणी घेऊन दोन्ही बाजूचे म्हणणे घेऊन या प्रमाणपत्रावर निर्णय करावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयात शिंदे यांच्या बाजूने सीनियर काउंसलर Ad.अनील अंतुरकर Ad. सुगंध देशमुख ,Ad.संदीप पाठक, यांनी काम पाहिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0