महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा | बिल क्लार्क, संगणक आणि वित्त व लेखा विभागाची महत्वाची भूमिका
पुणे|महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार याचे परिपत्रक जारी करण्यात आले होते. मंगळवार पासून महापालिका कर्मचाऱ्याच्या खात्यावर बोनस ची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जशी बिले तयार होतील, तशा पद्धतीने रक्कम देण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये सर्व विभागाचे बिल क्लार्क, संगणक आणि वित्त व लेखा विभागाची महत्वाची भूमिका राहिली आहे. बोनस मिळाल्यामुळे मात्र महापालिका कर्मचारी आनंदी आहेत. तसेच कर्मचारी प्रशासनाचेही आभार वक्त करत आहेत.
महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी बोनस अर्थात सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी दिली जाते.यंदा सन २०२१-२०२२ च्या मूळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३% + १९,०००/- इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक निघत नव्हते. ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार या प्रस्तावावर महापालिका आयुक्तांची स्वाक्षरी झाल्या नतर तात्काळ वित्त व लेखा विभागाने बोनस बाबतचे परिपत्रक जारी केले.
यामध्ये 18 ऑक्टोबर पर्यंत बिले तपासून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सानुग्रह अनुदान वेळेत आदा करणेसाठी पगार बिल ऑडीट विभागाकडील सर्व ऑडिटर सेवकांनी शनिवार व रविवार रोजी कामावर उपस्थित राहून सन २०२१- २०२२ या वर्षाची सानुग्रह अनुदान बिलांची तपासणी करण्यात यावी. असे आदेश वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी दिलेहोते. त्यानुसार आता महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यात सुरुवात झाली आहे. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये अनादांचे वातावरण आहे.