Black Spots in Pune City | पुणे शहरात वारंवार अपघात होणारे 21 ब्लॅकस्पॉट | सुधारणा करण्याचे पुणे पोलिसांचे पुणे महापालिकेला आदेश
Black Spots in Pune City | पुणे शहरात वारंवार अपघात होणारी 21 अपघात ठिकाणे (Black spot) पुणे पोलिसांकडून (Pune Police) निश्चित करण्यात आली आहेत. यात उपाययोजना करून सुधारणा करण्याचे आदेश पुणे पोलिसांकडून पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) देण्यात आले आहेत.
पोलिसांच्या आदेशानुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२० ते सन २०२२ या कालावधीत ५०० मीटर क्षेत्रामध्ये मागील सलग ३ वर्षामध्ये एकूण ५ प्राणांतिक किंवा गंभीर अपघात अथवा एकुण १० व्यक्ती (१ किंवा एकापेक्षा जास्त अपघात मिळून) मयत झाले असतील अशा २१ अपघात ठिकाणांची (Black Sports) वाहतुक शाखा पुणे शहर (Traffic police pune city) कडून नव्याने निश्चिती केली आहे. सबंधित ब्लॅकस्पॉट ठिकाणांची पाहणी होऊन त्या ठिकाणी अपघात (Accident) होऊ नये याकरीता सदर ठिकाणी सुधारणा/उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी केलेल्या सुधारणा / उपाययोजना बाबतचा अहवाल आम्हाला पाठवावा, असे ही आदेशात म्हटले आहे.
——-
सन-२०२२ पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील ब्लॅक स्पॉट
पोलिस स्टेशन अपघात ठिकाण एकुण अपघात
भारती विद्यापीठ. कात्रज चौक 10
भारती विद्यापीठ. दरी पुल 9
भारती विद्यापीठ. नविन कात्रज बोगदा 10
वारजे माळवाडी माई मंगेशकर हॉस्पीटल 12
वारजे माळवाडी मुठा नदी पुल 7
वारजे माळवाडी डुक्कर खिंड 10
सिंहगड रोड नवले पुल 33
सिंहगड रोड सेल्फी पॉईट 13
हडपसर आय बी एम कंपनी 8
हडपसर रविदर्शन चौक 19
लोणी काळभोर कदम वाक वस्ती 8
लोणी काळभोर लोणी स्टेशन चौक 7
लोणी काळभोर थेऊर फाटा चौक 8
विमानतळ टाटा गार्डरुम चौक 18
चंदननगर खराडी बायपास चौक 9
चंदननगर रिलायंस मार्ट 10
विमानतळ खराडी जकात नाका 10
विमानतळ विमाननगर चौक 8
विमानतळ ५०९ चौक 8
विमानतळ ५०९ चौक 8
मुढवा मुंढवा रेल्वे ब्रीज 6
लोणी काळभोर पालखी विसावा वडकी 24
लोणी काळभोर पालखी विसावा वडकी 24
———–
News Title | Black Spots in Pune City | 21 blackspots that frequently cause accidents in Pune city Pune Police order to Pune Municipal Corporation to make improvements