sharad pawar: पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता

HomeBreaking NewsPolitical

sharad pawar: पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता

Ganesh Kumar Mule Oct 16, 2021 12:09 PM

PEHEL 2024 Pune PMC | 53 tonnes of e-waste and plastic Waste accumulated in 4 hours
PMC Pune Vs Irrigation Department | पाटबंधारे विभागाकडून डोमेस्टिक दराऐवजी २० पट जास्त दर आकारून पुणे महानगरपालिकेस दिली जातात बिले | महापालिका म्हणते कुठलीही थकबाकी नाही
8 crores proposed for PMC Futuristic schools and 31.50 crores provision for DBT scheme!

पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका

पुणे : आम्ही अनेक सरकारं पाहिलं, राज्यविषयी केंद्र सरकारचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असायचा. पण आता भाजप सरकारकडून तसं होताना दिसत नाही.  अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी जाऊन आयकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात असल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पण त्यात काहीही निष्पन्न होणार नाही. पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता. पाहूणा जेव्हा जात नाही तेच त्याची हकालपट्टी केली जाते. पाहुण्यांची काही चुकी नव्हती. त्यांना वरून तसे आदेश देण्यात आले होते. असा आरोप राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केला. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

ईडी, सीबीआय, आयकर विभाग यासारख्या यंत्रणेचा वापर करून भाजपचा  गैरव्यवहार

पवार  पुढे बोलताना म्हणाले, अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी जाऊन आयकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात असल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पण त्यात काहीही निष्पन्न होणार नाही. पण 14 ते 15 लोकं 5 दिवस छापे मारतात, त्यांचं काम संपल्यानंतरही त्यांना थांबायला सांगितलं जात होतं. एखाद्याच्या घरी इतके लोक पाठवून पाच-पाच दिवस ठेवून दबाव आणला जात आहे. चौकशी झाल्यावर पाहुण्याने जाणे आवश्यक होते. परंतु हा पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता. पाहूणा जेव्हा जात नाही तेच त्याची हकालपट्टी केली जाते. पाहुण्यांची काही चुकी नव्हती. त्यांना वरून तसे आदेश देण्यात आले होते. विशेषतः भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात गैरवापर होताना दिसतो. ईडी, सीबीआय, आयकर विभाग यासारख्या यंत्रणेचा वापर करून गैरव्यवहार सुरू आहेत.

निवडणुकीपूर्वी मी येणारच असे म्हणणारे काही परत आले नाहीत. तेव्हा राज्य अस्थिर करण्यासाठी ते सत्तेचा गैरवापर करत आहेत. एकनाथ खडसे  हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या हाताखाली काम केले. 20 वर्षाहून अधिक काळ ते विधिमंडळत होते. पण त्यांनी पक्ष सोडला आणि त्यांच्याविरोधात खटले सुरू झाले. त्यांच्या जावयाविरोधात खटले सुरू झाले, असंही शरद पवार म्हणाले