BJP Pune | पुणे शहर भाजपची पाच लाख सदस्यांची नोंदणी | शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती

HomeBreaking News

BJP Pune | पुणे शहर भाजपची पाच लाख सदस्यांची नोंदणी | शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती

Ganesh Kumar Mule Mar 03, 2025 7:13 PM

MLC Election | BJP Pune | विधानपरिषद निवडणूक |  भाजपचा विजयी जल्लोष
Pune BJP Booth Chalo Abhiyan | लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपच्या वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान
Amol Balwadkar | जाणीवपूर्वक आत्मसन्मानाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न- अमोल बालवडकर | भाजपवर विश्वास; पक्षाची संस्कृती अशी नाही

BJP Pune | पुणे शहर भाजपची पाच लाख सदस्यांची नोंदणी | शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे शहर भाजपने पाच लाख प्राथमिक सदस्यांच्या नोंदणीचा टप्पा पूर्ण केला असल्याची माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. (BJP Pune)

घाटे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी या कामांना पसंती देऊन शहरातील भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी केले. त्याचेच प्रत्यंतर सभासद नोंदणीत येत आहे.”

घाटे म्हणाले, “समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा सदस्यता नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी काही दिवसात सहा लाख प्राथमिक सदस्य आणि दहा हजार सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”

घाटे पुढे म्हणाले, “पक्षाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती पासून (25 सप्टेंबर) सदस्यता नोंदणीचे अभियान सुरू केले. मिस्ड कॉल, नमो ॲप, वेबसाईट, क्यूआर कोड या माध्यमांतून सदस्य होता येते. दर पाच वर्षांनी ही प्रक्रिया केली जाते. प्राथमिक सदस्यत्वाची मुदत सहा वर्षे इतकी असते.”

विधानसभा मतदारसंघनिहाय सदस्यता संख्या

वडगाव शेरी : 53,599
शिवाजीनगर : 49,725
कोथरूड : 1,16,004
खडकवासला : 72,754
पर्वती : 54,610
हडपसर : 39,828
पुणे छावणी : 64,469
कसबा : 54,018

एकूण : 5,04997