BJP Pune Membership | पुणे शहरात भाजपाचे सदस्यता अभियान
BJP Pune Membership – (The Karbhari News Service) – भारतीय जनता पार्टी हे जगातील सर्वात मोठ्ठे राजकीय संघटन असून संपूर्ण देशभर भाजपाचे सदस्यता अभियान चालू आहे. आत्तापर्यंत संपूर्ण देशात ९ कोटी सदस्य जोडले गेले आहेत. पुणे शहरातील सदस्यता अभियाना संदर्भात आज शहर पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली होती. (BJP Pune)
पुणे शहर सदस्यता अभियान प्रमुख राघवेद्र मानकर यांनी प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणी करायचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांसमोर ठेवले. तसेच ५ जानेवारी रोजी घर चलो अभियान राबविण्यात येणार असून नागरिकांना सदस्य करून घ्यायचे आहे असे त्यांनी सांगितले. पियुष कश्यप यांनी सदस्यता नोंदणी संदर्भात सर्व तांत्रिक गोष्टींची माहिती कार्यकर्त्यांना दिली. सदस्य नोंदणी साठी ८८००००२०२४ ह्या क्रमांकावर एक फोन करून सदस्य करायचे आहे असे सांगितले.
यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. धनंजय महाडीक, शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, राघवेंद्र मानकर, प्रमोद कोंढरे, महेश पुंडे, राजेंद्र शिळीमकर उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्र सदस्यता अभियान प्रभारी जगदीश मुळीक यांनी राज्यामध्ये पुणे शहराची सदस्य नोंदणीची संख्या सर्वात जास्त असली पाहिजे असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण चंद्रकांत दादा पाटील यांनी सदस्यता अभियानाचे महत्व विषद केले. दर सहा वर्षांनी सदस्यता अभियान होते. निवडणूक असलेली राज्य सोडून इतर ठिकाणी ९ कोटी सदस्यता झाली आहे. संपूर्णपणे लोकशाही पद्धतीने संघटनेच्या निवडणुका होतात. पुणे शहरात विधानसभेला पडलेल्या मतांपेक्षा जास्त नोंदणी झाली पाहिजे असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
सदस्यता अभियानाचे पुणे शहर प्रभारी खासदार धनंजय महाडीक यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने एक उद्दिष्ट ठेवून सदस्य नोंदणी करायची आहे असे सांगितले. सक्रिय सदस्य होण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कमीत कमी ५० सदस्य नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून ८० हजार ते एक लक्ष नोंदणी झाली पाहिजे असेही आवाहन महाडिक यांनी केले.
पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांची मोठी साखळी असून पुणे शहरात १० लक्ष सदस्य करण्याची क्षमता आहे असे सांगितले. ते पुढे म्हणाले कि ह्या अभियानात पुण्यातील सर्व जुने आणि सध्या कार्यरत असलेले असे १०००० कार्यकर्ते सहभागी होतील. त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना ८८००००२०२४ या सदस्यता नोंदणी संपर्क करायला लावून उपस्थित सर्वांची नोंदणी करून घेतली. सदस्य नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोप्पी असून कार्यकर्त्यांनी पुण्यातील नागरिकांना मोठ्या संख्यने सदस्य करून घ्यायचे आवाहन त्यांनी केले.
COMMENTS