BJP Maharashtra Adhiveshan | महायुतीचा निर्णय होईल तेव्हा होईल, मात्र पक्ष नेतृत्वावर श्रद्धा ठेऊन काम करा | आपण विधानसभेत 200 च्या वर जागा जिंकू | चंद्रशेखर बावनकुळे

HomeBreaking Newsपुणे

BJP Maharashtra Adhiveshan | महायुतीचा निर्णय होईल तेव्हा होईल, मात्र पक्ष नेतृत्वावर श्रद्धा ठेऊन काम करा | आपण विधानसभेत 200 च्या वर जागा जिंकू | चंद्रशेखर बावनकुळे

गणेश मुळे Jul 21, 2024 8:08 AM

Dheeraj Ghate | BJP Pune | पुणे भाजप शहर अध्यक्ष पदी धीरज घाटे
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणविसांना सागर बंगला मिळावा म्हणून आपण हे सरकार आणलं नाही | ध्येयाकडे जाताना काही तह करावे लागतात | अधिवेशनात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Amit Shah on Sharad Pawar | ५८ वर्षांत तुम्ही गरिबांसाठी काय केलं | अमित शाह यांचा काँग्रेस ला सवाल | शरद पवारांना दिली भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार अशी उपमा

BJP Adhiveshan | महायुतीचा निर्णय होईल तेव्हा होईल, मात्र पक्ष नेतृत्वावर श्रद्धा ठेऊन काम करा | आपण विधानसभेत 200 च्या वर जागा जिंकू | चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule – (The Karbhari News Service) – विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय होईल. कोण लढेल ते वरिष्ठ ठरवतील. पण आपल्याला पक्षासाठी काम करायचे आहे. चार महिने पक्षावर, नेतृत्वावर श्रद्धा ठेवा आणि काम करा. येत्या निवडणुकीत विधानभवनावर भगवा फडकावायचा असेल, तर सर्वांनी घरोघरी जाऊन काम करावे. आपल्याला दोनशेच्यावर जागा मिळतील. मला घमंड नाही, तर आत्मविश्वास आहे. प्रत्येक बुथवर दहा मते वाढवा, आपला विजय निश्चित आहे, असे आवाहन आत्मविश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. (Vidhansabha Election)

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन बालेवाडीत आज सुरू आहे. त्यावेळी बावनकुळे यांनी प्रास्ताविक केले आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

बावनकुळे म्हणाले, लोकसभेला आपल्याला अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला. पण मतांची आकडेवारी पाहिली तर थोड्या मतांनी आपल्या अनेक जागा गेल्या. आता विधानसभेला प्रत्येक बुधवर दहा मते वाढविली तर आपला विजय निश्चित आहे. विधनसभेत आपल्याला चांगले यश मिळेल. विरोधकांनी खोटेपणा करून लोकसभेत आपल्याला पराभूत केले. पण आता त्या पराभवातून आपण शिकलो आहोत. त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. खरंतर मराठा समाजासाठी देवेंद्रजींनी रात्ररात्रं काम केलं आहे. मराठ्यांना आरक्षण दिले. तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. आज आंदोलन करताना देवेंद्रजी यांना टार्गेट केले जात आहे. मराठा आरक्षणाला आम्ही पाठिंबा देतोय. देवेंद्रजी यांनी जो कायदा केला, त्याचा मारेकरी शोधा.

बावनकुळे पुढे म्हणाले, उद्याचे महाविकास आघाडीला मत म्हणजे मोदींच्या योजना थांबविण्यासाठी असेल. म्हणून १४ कोटी जनतेला माझे आवाहन आहे की, असे करू नका. योजना बंद करू नका. आज घरोघरी जाऊन मोदी सरकारचे काम सांगायला हवे. लोकप्रिय योजना पुढे नेण्यासाठी काम करायचे आहे. मनात निराशा ठेवू नका. सर्वांनी नेटाने काम करावे. आपले नेते दणकट आहेत. कार्यकर्ता हा आपला श्वास आहे. इथून गेल्यावर प्रत्येक बुथवर जाऊन काम करायचे आहे.