भाजपने या शिलेदाराकडे दिली पुणे महापालिका निवडणुकीची सूत्रे
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीमध्ये (PMC election) पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता राखण्यासाठी शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे (General secretary Rajesh pandey) यांची पक्षाने महापालिका निवडणूक प्रमुख या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. भाजपने नेहमीच्या जुन्या शिलेदाराकडे याची जबाबदारी न देता ती या संघटनेत महत्वाच्या असणाऱ्या पांडे यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
पुण्यातील निवडणुकीतील भाजपची सूत्रे कोणाकडे जाणार याची उत्सुकता होती. खासदार गिरीश बापट किंवा पालिकेतील कोणत्या तरी पदाधिकाऱ्याला सहप्रभारी म्हणून जबाबदारी मिळणार, याची चर्चा होती. प्रत्यक्षात बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ, गटनेते गणेश बीडकर यांच्यापैकी कोणाकडेही जबाबदारी न देता पांडे यांचे पुढे करण्यात आले आहे. पर्यायाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सारी सूत्रे राहणार असल्याचेही पांडे यांच्या निवडीमुळे स्पष्ट झाले आहे. चंद्रकात पाटील यांनी गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली पुण्याची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.
मितभाषी असलेले पांडे हे गेल्या 30 वर्षांपासून संघ परिवारात सक्रिय आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले पांडे अकरावीमध्ये शिक्षणासाठी पुण्यात आले. तेव्हापासूनच ते पुण्यात आले. करियरच्या सुरवातीच्या टप्प्यात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते.
COMMENTS