Bhide Wada Smarak High Court | उच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे सावित्रीबाई फुलेंना मानवंदना : डॉ. सिद्धार्थ धेंडे

HomeBreaking Newsपुणे

Bhide Wada Smarak High Court | उच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे सावित्रीबाई फुलेंना मानवंदना : डॉ. सिद्धार्थ धेंडे

Ganesh Kumar Mule Oct 16, 2023 3:19 PM

Pune Airport Road | एअरपोर्ट रस्त्यावरून होणार विना अडथळा प्रवास | सम्राट अशोक चौक, येरवडा पोस्ट कार्यालय येथे सिग्नल कार्यान्वीत
PMC Ward no 2 | पावसाळी समस्येतून प्रभाग दोन मधील नागरिकांची होणार सुटका | तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
Dr Siddharth Dhende | दुकानदारांकडून धान्य विक्रीतील काळा बाजार न थांबल्यास उपोषण करू | पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा इशारा

Bhide Wada Smarak High Court | उच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे सावित्रीबाई फुलेंना मानवंदना : डॉ. सिद्धार्थ धेंडे

– भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा ; पुणे महापालिकेकडे हस्तांतरणाचा न्यायालयाचा निर्णय

 

Bhide Wada Smarak High Court | भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक (Bhide wada National Memorial) होण्याचा अंतिम मार्ग मोकळा झाला आहे. भिडे वाड्याचे पुणे महापालिकेकडे (pune Municipal Corporation) हस्तांतरण करण्याचा निर्णय उच्च  न्यायालयाने (High Court) दिला आहे. असंख्य सामाजिक संघटना, नेत्यांनी दिलेल्या लढ्याचे हे यश आहे. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे नवरात्री मध्ये सावित्रीबाई फुलेंना (Savitribai Phule)  खऱ्या अर्थाने दिलेली मानवंदना आहे, अशी भावना पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी व्यक्त केली. (Bhide Wada National Memorial High Court)

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू सामाजिक, ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे ; मात्र त्या वास्तूचे योग्य प्रकारे जतन होत नसल्याची तक्रार होती. त्याचे जतन करून राष्ट्रीय स्मारक करा, अशी मागणी सामाजिक संघटना करत आहेत. सामाजिक संघटनांच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने स्मारकासाठी 50 कोटींची तरतूद केली होती. मात्र काही तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रत्यक्ष स्मारक उभारले न्हवते. (Pune Bhide Wada News)

भिडे वाडा महापालिकेकडे हस्तांतरण करावे यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत हे प्रकरण प्रलंबित होते. विविध सामाजिक संस्था संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यासाठी लढा देत होते. त्या लढ्याला अखेर यश आले आहे. उच्च न्यायालयाने भिडे वाडा पुणे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्ञानार्जनाला अभिप्रेत असणारे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे ज्यांच्यामुळे स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम झाले आहे. त्या सावित्रीबाई फुलेंना या निर्णयामुळे मानवंदना मिळाली असल्याचे डॉ. धेंडे म्हणाले. (Bhide Wada Smarak Pune)
—————————

रिपाइच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव –

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी आरपीआयच्या वतीने लढा देण्यात आला. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. भिडे वाडा येथे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून पेढे वाटून आनंद साजरा केला.