Bhavani Peth Ward Office |  भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय कडील उपअभियंता ठेकेदाराकडून वसूली करत असल्याचा आरोप |  चौकशी करून निलंबन करण्याची भाजप नेते तुषार पाटील यांची मागणी

PMC Building

HomeBreaking News

Bhavani Peth Ward Office | भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय कडील उपअभियंता ठेकेदाराकडून वसूली करत असल्याचा आरोप | चौकशी करून निलंबन करण्याची भाजप नेते तुषार पाटील यांची मागणी

Ganesh Kumar Mule Aug 21, 2024 8:24 PM

PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल जाहीर | १७ ऑक्टोबर ला कागदपत्रांची छाननी  | जाणून घ्या सविस्तर 
PMC Contract Employees Bonus | Sunil Shinde | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत राष्ट्रीय मजदूर संघ (RMS) करणार आमरण उपोषण
MLA Madhuri Misal | पुणे शहराच्या विकासाला गती द्या | आमदार माधुरी मिसाळ यांची उपमुख्यमंत्र्यांना विनंती

Bhavani Peth Ward Office | भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय कडील उपअभियंता ठेकेदाराकडून वसूली करत असल्याचा आरोप

| चौकशी करून निलंबन करण्याची भाजप नेते तुषार पाटील यांची मागणी

 

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय (Bhavani Peth Ward Office) कडील उपअभियंता वासुदेव कुरबेट (Deputy Engineer Vasudev Kurbet) हे ठेकेदाराकडून वसुली करत असल्याचा आरोप शहर भाजपचे उपाध्यक्ष तुषार पाटील (Tushar Patil BJP Pune) यांनी केला आहे. याबाबत पाटील यांनी महापालिका आणि लाचलुचपत विभागाला पुरावे देखील दिले आहेत. तसेच संबंधित उपअभियंता यांची चौकशी करुन निलंबन करण्याची मागणी तुषार पाटील यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation-PMC)

तुषार पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे झोपडपट्टी मधील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेल्याने जनजीवन उद्ध्वस्त झाले. तसेच नजीकच्याच टिंबर मार्केट मध्ये व्यापन्यांच्या दुकानांमध्ये पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले. त्यावर कर्तव्य बजावताना कुठेही न दिसलेले कुरबेट हे ठेकेदारांकडून वसूली’ करण्यात व्यस्त असलेले आमच्या निदर्शनास आले आहे. याचा पुरावा म्हणून त्यांनी ऑनलाइन त्यांची कन्या हिच्या नावावर २००००/- ( वीस हजार) घेतल्याचा पुरावा आहे. तसेच ठेकेदार यांना हाताशी धरून त्यांना चुकीच्या कामामध्ये मदत करून ठेकेदारांचे भले करीत आहेत.

पाटील यांनी पुढे म्हटले आहे कि, तसेच काही ठेकेदारांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केल्यामुळे ठेकेदारांनी या आधी देखील बऱ्याच वेळ या अधिकाऱ्याची लेखी तक्रार देखील केलेली आहे. तसेच वेतन पालिकेचे घेवून मुजोरी ठेकेदारांची का ? असा आम्हाला पडलेला गंभीर प्रश्न आहे. असे पाटील यांनी म्हटले आहे. तरी अश्या मुजोर व भ्रष्ट अधिकारी कुरबेट यांची तत्काळ चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करावी. अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
——-

लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या आरोपांबाबत मी माझा खुलासा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे दिला आहे. अतिरिक्त आयुक्त याबाबत निर्णय घेतील.

वासुदेव कुरबेट, उप अभियंता.
——-