Bapusaheb Pathare | भाजप मध्ये कार्यरत असलेले बापूसाहेब पठारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश! 

HomeBreaking News

Bapusaheb Pathare | भाजप मध्ये कार्यरत असलेले बापूसाहेब पठारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश! 

Ganesh Kumar Mule Sep 17, 2024 6:00 PM

Ajit Pawar on Bapu Pathare | आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत ; अजित पवारांचा माजी आमदार बापू पठारे यांना इशारा
MLA Sunil Tingre | वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार सुनिल टिंगरे यांना संधी 
Vidhansabha Election Pune | पुण्यात काँग्रेस कडून रविंद्र धंगेकर, तर शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रशांत जगताप, बापूसाहेब पठारे यांना संधी

Bapusaheb Pathare | भाजप मध्ये कार्यरत असलेले बापूसाहेब पठारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश!

 

Vadgaonsheri Vidhansabha – (The Karbhari News Service) – पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार झालेले आणि सध्या भाजप मध्ये कार्यरत असणारे बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) (NCP – Sharadchandra Pawar) पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक भैयासाहेब जाधव (Bhaiyasaheb Jadhav) यांनी देखील प्रवेश केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver oak) या ठिकाणी हा प्रवेश झाला आहे.   दरम्यान यामुळे वडगावशेरी मतदार संघात पवार गटाची ताकद वाढली असे मानले जात आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगावशेरी मतदार संघातील राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. (Pune Politics)

बापूसाहेब पठारे हे २००९ मध्ये पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन आमदार होते. सध्या ते भाजपामध्ये कार्यरत होते.  २०१४ साली भाजपाचे नेते जगदीश मुळीक हे आमदार झाले. त्या निवडणुकीच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे बापूसाहेब पठारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्या भागातील प्राबल्य लक्षात घेऊन २०१९ निवडणुकीत भाजपाकडून बापूसाहेब पठारे यांना संधी मिळेल असे वाटत होते. मात्र विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना भाजप नेतृत्वाने संधी दिली. मात्र त्या निवडणुकीत जगदीश मुळीक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २०१९ च्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. या तीनही निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल पाहता आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहिल्यानंतर भाजपाचे नेते बापूसाहेब पठारे यांनी शरद पवार गटात परतण्याचे संकेत दिले होते.

त्यानुसार पठारे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्वर ओक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी देखील पवार गटात प्रवेश केला आहे. जाधव यांना निवडून आणण्यात बापूसाहेब यांचा सिंहाचा वाटा होता. दरम्यान या प्रवेशामुळे मात्र वडगावशेरी मतदार संघात शरद पवार गटाची ताकद वाढली असे मानले जात आहे. शिवाय येत्या २७ तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजप आणि अजित पवार गटाच्या वादात शरद पवार गट बाजी मारणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रवेशावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, महादेव पठारे, सुरेंद्र पठारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.