बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचा जोश-२०२२ (JOSH-2022) कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
काल बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचा जोश-२०२२ (JOSH-2022) हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली ६ वर्षे सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनच्या सर्व सभासदांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये डान्स, फॅशन शो, लहान मुलांसाठीच्या स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या दरम्यान डॉ. जे. एस. महाजन यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच जनहितासाठी कायदेशिर कामगिरी बजावत असलेल्या ॲड.सत्येन्द्र मुळे यांचा देखिल विशेष सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय आइस स्केटिंग चॅम्पियन प्रियांशू साळवे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच वैद्यकीय क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल डॉ. केदार साठे व डॉ. अर्चना डांगरे यांना असोसिएशनच्या वतीने बीएमए गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनच्या व बाणेर बालेवाडी भागातील प्रत्येक वैद्यकीय संस्था व डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. तसेच त्यांच्या हातून होणारे सामाजिक कार्य आणि रुग्णांप्रती असणारी आपुलकीची भावना याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली होती तसेच मा.नगरसेविका ज्योतीतीई कळमकर, मा.नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, भाजपा नेते गणेशजी कळमकर, भाजपा नेते प्रल्हादजी सायकर, डॉ. राजेश देशपांडे, डॉ. बबन साळवे, डॉ. सागर सुपेकर, डॉ. प्रिया देशपांडे, डॉ. दीपाली झंवर, डॉ. रितू लोखंडे, डॉ. सुषमा जाधव, डॉ. सुवर्णा साळवे व इतर मान्यवर उपस्थित होते.