B. G. Kolse Patil | मोदींनी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा | माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे मत

HomeBreaking Newsपुणे

B. G. Kolse Patil | मोदींनी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा | माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे मत

गणेश मुळे May 08, 2024 3:03 PM

Pune Airport | Pune Metro | Pune Congress | पुणे मेट्रोची सेवा तात्काळ विमानतळापर्यंत करा | काँग्रेस आक्रमक
Rahalkar Ram Mandir Pune | Pune Congress Mahaaarti |सदाशिव पेठेतील रहाळकर राममंदिरात पुणे काँग्रेस कार्यकर्ते करणार महाआरती
Pradeep Kurulkar Case | शास्त्रज्ञ कुरुलकरांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची जोरदार निदर्शने

B. G. Kolse Patil | मोदींनी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा | माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे मत

 

B. G. Kolse Patil – (The Karbhari News Service) – गेल्या‌ दहा वर्षात‌ देशाची सत्ता‌ चालवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपने मोठ्या प्रमाणात घोटाळे केले आहे. आतापर्यंत झालेल्या तीनही टप्प्यातील मतदानातून मोदी‌ सरकार जाणारहे‌ स्पष्ट झाले आहे. मात्र, “झोला लेके निकलूंगा” असे म्हणणाऱ्या मोदींनी जाण्यापूर्वी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावाअशी मागणी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली. (Ravindra Dhangekar Pune Loksabha) 

 

पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीइंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील बोलत होते. यावेळी पुणे लोकसभा प्रचार प्रमुख माजी आमदार मोहन जोशीराज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.

 

कोळसे पाटील म्हणालेसंविधान सर्वश्रेष्ठ असून सर्वोच्च न्यायालयसंसद नंतर आहे. निवडणुक आयोगन्यायमूर्ती यांच्या नियुक्तींची प्रक्रीया बदलली. मोदी  शहांना प्रत्येक संस्थेवर ताबा मिळवायचा आहे. कायदे पायदळी तुडवण्याचे काम केले. निवडणुक रोख्यांचा जगात सर्वात मोठा घोटाळा असल्याचे निर्मला सितारामन् यांचे पती म्हणत आहेत. मुलभुत हक्काची पायमल्ली होत असेल तर न्यायालय स्वत:हून अॅक्शन घेते. मात्रदेशात मुलभुत हक्काची पायमल्ली होत असताना गेल्या दहा वर्षात एकदाही सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो अॅक्शन घेतली नाही. कायद्याचे दात काढण्याचे काम मोदी शहांनी केले आहे.

 

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यानंतर मोदी जाणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव दिसत आहे. झोला घेवून जाता येणार नाहीत्यापूर्वी त्यांना केलेल्या ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागेल. त्यानंतर त्यांनी कुठे जायचे तिकडे जावेअसेही कोळसे पाटील म्हणाले.

 

मोदींसारखा खोटं बोलणारा नेता यापूर्वी कधी देशाने पाहिला नाही. नोटबंदीनंतर काळा पैसा देशात आला का खोटं बोलून लाचारांची‌ फौज पुढे बसवून हसायला लावणारे मोदी आहेत. धमकी देवून धंदा व चंदा‌ गोळा केला. दहा‌ते लाख‌ लोक‌ देश सोडून परदेशात स्थायीक झाले. देशात बेकारी वाढलेली आहे. राहुल गांधी बुद्धांच्या‌ वाटेने चालत असून त्यांना देशाची‌ चिंता आहे. वसंतदादा व इतर लोक कमी शिकलेले होतेतरीही त्यांनी संसद गाजवली. तशाच प्रकारे रविंद्र धंगेकर संसद गाजवतीलअसेही कोळसे पाटील म्हणाले.

 

————–

 

म्हणून पानसरे यांची हत्या झाली :

 

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर याबाबतची माहिती नागरिकांना देण्यासाठी मीएम. एन. मुश्रीफ आणि कॉ. गोविंद पानसरे आम्ही राज्यात “हु इज‌ करकरे” या आंतर्गत सभा घेणार होतो. दोन सभा झाल्यानंतर पानसरे यांची हत्या झाली. ही हत्या मुंबई हल्ल्यासंदर्भात खरी माहिती लोकांसमोर येऊ नयेम्हणून करण्यात आली. त्यानंतर त्याला “शिवाजी कोण होता?” या पुस्तकामुळे झाल्याची चर्चा घडवण्यात आली.मुंबई हल्ल्यासंदर्भात आयबीने माहिती दिली होती. मात्रत्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.  माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विचारसरणी हिंदुत्ववादी होतीते पूर्वीपासूनच आरएसएसशी निगडीत होते. त्यामुळे त्यांनी सरकारी वकील म्हणून योग्य प्रकारे काम केले नाहीअसेही कोळसे पाटील म्हणाले.