औरंगाबाद सामूहिक बलात्कार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवणार
रूपाली चाकणकरांची माहिती
मुंबई :औरंगाबाद सामूहिक बलात्कार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवणार, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
चाकणकर यांनी सांगितले कि आज बिडकीन पोलीस स्टेशनमधून आपल्याशी संवाद साधत आहे.हा निर्णय फास्ट ट्रॅक न्यायालयात चालावा तसेच आरोपींनी ज्या निर्दयपणे सामुहिक बलात्कार केलेला आहे,यामध्ये कोठेही आरोपींच्या शिक्षेसाठी दिरंगाई होणार नाही यासाठी राज्य महिला आयोग लक्ष घालेल. पिडितीच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात आलेले आहे.तसेच ग्रामीण रुग्णालयात पिडीतेला आज पुन्हा उपचारासाठी दाखल करून ,मानसिक आधार देऊन समुपदेशन करण्यात येणार आहे.
COMMENTS