August Kranti Din | बाल विकास मंदिर शाळेत क्रांति सप्ताह साजरा

HomeBreaking Newsपुणे

August Kranti Din | बाल विकास मंदिर शाळेत क्रांति सप्ताह साजरा

Ganesh Kumar Mule Aug 09, 2023 7:52 AM

Sports Camp | बाल विकास मंदिर शाळेत क्रीडा शिबिराचे आयोजन
Bal Vikas Mandir School | बाल विकास मंदिर शाळेत पर्यावरण संवर्धन उपक्रम
Atharvashirsha Pathan | सासवड येथे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

August Kranti Din | बाल विकास मंदिर शाळेत क्रांति सप्ताह साजरा

August Kranti Din |  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत १ ते ९ ऑगस्ट दरम्यान क्रांती सप्ताह साजरा करण्यात आला. (August Kranti Din)
 इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ९ आॅगस्ट, अर्थात क्रांती दिन! (August Kranti Din) स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ आॅगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान दिले, समाजपरिवर्तन घडवून आणले, शैक्षणिक क्रांती घडवून आणली अशा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वासुदेव बळवंत फडके, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, स्वामी विवेकानंद
यांच्या वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी रोज या क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती सांगितली.  यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षक , पालक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी क्रांतिकारकांचे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. आज रोजी भारत माता पूजन करुन या उपक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा क्रांतिवीरांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांसोबत इतर सर्व  विद्यार्थी, शिक्षक यांनी दिल्या. यामुळे संपूर्ण शालेय परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध क्रांतिवीरांच्या  देशकार्याची माहिती मिळाली, विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण होण्यास मदत झाली. या उपक्रमाचे मुख्याध्यापिका सौ. मंजुषा चोरामले, पालक यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख सुरेखा जगताप यांनी केले.यावेळी मुख्याध्यापिका सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.