राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनाला महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य
| महापालिका आयुक्तांचे आदेश
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त (Maharashtra state Anniversary) आयोजित राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व सेवकांची उपस्थित अनिवार्य आहे. या अनुषंगाने सर्व खातेप्रमुख यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व विभाग व उप विभागातील सेवकांना ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी / सेवकांची उपस्थिती घेण्यात यावी व उपस्थितीचा अहवाल सर्व खातेप्रमुख यांनी न चुकता दिनांक ४/५/२०२३ पर्यंत कामगार कल्याण विभागाकडे सादर करावा. ज्या अधिकारी / सेवकांना ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणे शक्य नसेल त्यांनी नजिकच्या शासकीय अथवा सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून तसे लेखी प्रमाणपत्र खातेप्रमुखांकडे सादर करावे.
तरी, सर्व संबंधितांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित रहावे. असे आदेशात म्हटले आहे. (Maharashtra State Anniversary)