Assistant Municipal Commissioner PMC Property Tax | प्रशासन अधिकारी सुनिल मते यांच्याकडे सहाय्यक  आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार! 

HomeपुणेBreaking News

Assistant Municipal Commissioner PMC Property Tax | प्रशासन अधिकारी सुनिल मते यांच्याकडे सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार! 

गणेश मुळे Jan 31, 2024 3:58 PM

Pune Property Tax PT 3 | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा मिळकतकर विभागाच्या उपायुक्तांना आंदोलन करण्याचा इशारा
PMC Employees Transfer | मिळकत कर, भवन रचना विभागातील बदल्यात आर्थिक देवाणघेवाण  | कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आंदोलनाचा इशारा 
Pune Municipal Corporation sent 12 lakh propertytax bills through WhatsApp Chatbot

Assistant Municipal Commissioner PMC Property Tax | प्रशासन अधिकारी सुनिल मते यांच्याकडे सहाय्यक  आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार!

| प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडे दोन सहाय्यक  आयुक्तांची पदे

Assistant Municipal Commissioner PMC Property Tax | पुणे | महापालिकेच्या मिळकतकर विभागात (PMC Property tax Department) प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या सुनिल मते (Sunil Mate PMC) यांना महापालिका सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC Commissioner) यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. (Assistant Municipal Commissioner PMC Property Tax)
The karbhari - Assistant Municipal commissioner order

सहायक आयुक्त पदाबाबत महापालिका आयुक्त यांनी जारी केलेले आदेश

महापालिकेच्या मिळकतकर विभागासाठी दोन सहाय्यक आयुक्त पदे निर्माण करण्यात आली आहेत. मात्र वैभव कडलख सेवानिवृत्त झाल्याने एक सहायक आयुक्त पद रिक्त झाले होते. बऱ्याच महिन्यापासून हे पद रिक्त होते.    दरम्यान या पदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी सुनील मते यांच्याकडे देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. एक सहायक आयुक्त पद हे अस्मिता तांबे यांच्याकडे आहे. तसेच प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडे सध्या तीन प्रशासन अधिकारी आहेत. यामध्ये सुनिल मते, रविंद्र धावरे आणि संजय शिवले यांचा समावेश आहे. (Pune PMC News)