Artificial intelligence | (MARVEL) |  मार्वल’ च्या माध्यमातून पोलीस दलाला मिळणार कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची (AI) साथ

HomeपुणेBreaking News

Artificial intelligence | (MARVEL) | मार्वल’ च्या माध्यमातून पोलीस दलाला मिळणार कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची (AI) साथ

गणेश मुळे Jul 20, 2024 7:09 AM

Dhangar Reservation | धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Shivaji Maharaj Jayanti | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन
National Senior Body Building Competition | 16व्या नॅशनल सीनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी पुण्याच्या ओंकार नलावडे व शितल वाडेकरची निवड

Artificial intelligence | (MARVEL) |  मार्वलच्या माध्यमातून पोलीस दलाला मिळणार कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची (AI) साथ 

 

​Artificial intelligence – (The Karbhari News Service)  जगात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा (एआय) वापर झपाट्याने वाढत आहे. राज्यातही नुकतीच ‘मार्वल’ कंपनीची स्थापना करण्यात आली असून कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करून गुन्ह्यांची उकल करण्यात महाराष्ट्र पोलीस  दलाला याची जोड मिळणार आहे. त्याचबरोबर भविष्यात सर्वचक्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ होईल.

​आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हासध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. राज्यातील नागरिकांचे जीवन सुकर करण्याच्या उद्देशाने या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेऊन राज्य शासनाने कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करुन गुप्तवार्ता क्षमता भक्कम करण्यासाठी आणि अपराधांचा पूर्वानुमान लावण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच राज्य पोलीस दलास कायदा अंमलबजावणीचे कार्य अधिक  प्रभावीपणे करता यावे यासाठी राज्यात ‘Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement (MARVEL)’ ‘मार्वल’ ही कंपनी स्थापन केली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अशाप्रकारचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्यअसून यामुळे गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत जाणून, उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून कुठे गुन्हा घडू शकतो, कुठे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. आदी बाबींचे अनुमान आधीच लावता येऊ शकणार आहे.

​‘मार्वल’ स्थापन करण्याबाबत राज्य शासन, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर आणि मे. पिनाका टेक्नॉलॉजीज खाजगी मर्या. यांच्यात दि.22 मार्च 2024 रोजी त्रिपक्षीय करार करण्यात येऊन शासनाची ही कंपनीअधिनियम 2013 खाली नोंदणीकृत करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री   फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील पोलीस जिमखाना येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिव तथा गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव (अतिरिक्त कार्यभार) सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. मानवी आकलनशक्ती आणि तर्कावर आधारित निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर जटील समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर केला जाऊ लागला आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस दलाला याचा मोठा लाभ होऊ शकणार आहे.

सद्यस्थितीत शासनाच्या विविध विभागांकडे प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध असते. त्याचप्रमाणे पोलीस दलाकडे गुन्हे आणि गुन्हेगारांसंबंधीमाहिती मोठ्या प्रमाणावर येत असते. सायबर आणि आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ होत असून नागरिकांच्या फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबिले जात आहेत. या माहितीचा वापर करून विश्लेषण करायला आणि मनुष्याप्रमाणे निर्णय घ्यायला आधुनिक संगणकालाच शिकवले तर याचा मोठा लाभ होऊ शकतो. हाच धागा पकडून महाराष्ट्र पोलीस दलात एआयचा वापर करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 16 मार्च 2024 रोजीच्या बैठकीत घेतला.

या उपक्रमातील मे. पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या. ही चेन्नई स्थित कंपनी असून त्यांना भारतीय नौदल, गुप्तवार्ता विभाग, आंध्र प्रदेश, आयकर विभाग, सेबी आदी संस्थांना एआय सोल्युशन्स पुरविण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्याविशेषज्ञतेचा उपयोग व्हावा या उद्देशाने ‘मार्वल’ चे कार्यालय नागपूर येथे भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या आवारात आहे. पोलीस दलाच्या मागणीनुसार‘पिनाका’ एआय सोल्युशन्स पुरवेल तर, भारतीय व्यवस्थापन संस्थासंशोधन आणि प्रशिक्षणामध्ये सहकार्य करणार आहे. नागपूर (ग्रामीण) चेपोलीस अधीक्षक, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर चे संचालक हे याकंपनीचे पदसिद्ध संचालक असतील आणि मे.पिनाका टेक्नोलाजीजखाजगी मर्या.चे संचालक हे या कंपनीच्या संचालक मंडळावर असतील तरनागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक हे पदसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारीअसणार आहेत.

00000