Archana Tushar Patil | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने अर्चना तुषार पाटील यांचा सन्मान  | सेवेची संधी देणाऱ्या जनतेला समर्पित: अर्चना पाटील

HomeBreaking Newsपुणे

Archana Tushar Patil | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने अर्चना तुषार पाटील यांचा सन्मान | सेवेची संधी देणाऱ्या जनतेला समर्पित: अर्चना पाटील

गणेश मुळे Aug 01, 2024 3:19 PM

PMC Health Department | कीटकजन्य आजारांबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती 
PMC Aspirational Toilets | 4 आकांक्षी शौचालय तयार करण्याच्या बदल्यात 4 ठिकाणी होर्डिंग उभारायला महापालिका ठेकेदाराला देणार परवानगी! 
Pune Traffic Update | १ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

Archana Tushar Patil | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने अर्चना तुषार पाटील यांचा सन्मान

| सेवेची संधी देणाऱ्या जनतेला समर्पित : अर्चना पाटील

 

Lokshari Anna Bhau Sathe Samaj Bhushan Award – (The Karbhari News Service) – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा समाज भूषण पुरस्काराने मा. नगरसेविका व स्थायी समिती सदस्या अर्चना तुषार पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

पुणे शहर जिल्हा मातंग समाज व अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती तर्फे दरवर्षी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुनीलभाऊ कांबळे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना अर्चना पाटील यांनी सर्व प्रभागातील नागरिकांचे आभार मानले. ‘मा. खासदार संजय नाना काकडे, मा. राज्यमंत्री दिलीपभाऊ कांबळे, आमदार सुनीलभाऊ कांबळे, माझ्या पक्षातील सर्व वरिष्ठ व विशेषतः नागरिक यांच्या सहकार्याने मला सेवेची संधी मिळाली म्हणूनच माझा हा सन्मान या सर्वांचा आहे. भविष्यातही या पुरस्काराला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, अर्चना पाटील यांनी सांगितले.

सदा ढावरे, सचिव श्री डाडर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.